बैठकांमध्ये केवळ कीर्तन करायचे का ? - जळगावात लोकप्रतिनिधींचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:37 PM2020-06-30T12:37:29+5:302020-06-30T12:38:09+5:30

चार महिने होऊनही उपायोजना का नाही ? प्रशासनाला विचारला जाब

Do you just want to do kirtan in meetings? - Anger of people's representatives in Jalgaon | बैठकांमध्ये केवळ कीर्तन करायचे का ? - जळगावात लोकप्रतिनिधींचा संताप

बैठकांमध्ये केवळ कीर्तन करायचे का ? - जळगावात लोकप्रतिनिधींचा संताप

Next

जळगाव : टेंडर निघून चार-चार महिने होऊनही उपाययोजना होत नाहीत, गेल्या बैठकीत काय निर्णय झाले त्यावर कार कार्यवाही झाली़ याची काहीच माहिती दिली जात नाही मग बैठकांमध्ये केवळ कीर्तन करायचे का? असा संतप्त सवाल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला केला़
कोरोना संदर्भात सोमवारी उपाययोजनांच्या आढाव्या संदर्भात नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींनी भावना मांडल्या़ आमदार निधी देऊनही साहित्य येत नसल्याबाबत त्यांनी जाब
विचारला़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ व्हँटीलेटर्स आहेत़ मंगळवारपर्यंत ३४ व्हँटीलेटर्स येणार असून जुलै अखेरपर्यंत पूर्ण ६८ व्हँटीलेटर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी दिली़ रेकॉर्ड टायमिंगमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे ते सांगत असतानाच खासदार उन्मेश पाटील यांनी त्यांना थांबवत हे डिले टायमिंग झाले आहे़ रेकॉर्ड नव्हे़ चार महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे़ आणि अद्यापही पूर्ण व्हँटीलेटर्स आलेले नाहीत़ खासगी रुग्णालयांमध्ये दहा दिवसात डिजिटल एक्सरे आले़
शासकीय महाविद्यालयात मात्र, आताही धुवून एक्सरे काढले जातात़ साहित्य अद्यापही आलेले नाही़ असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला़ आमदार मंगेश चव्हाण यांनी अनेक ठिकाणी असुविधा असल्या मुद्दा मांडला़
बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील, चंदूलाल पटेल, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, सुरेश भोळे, लता सोनवणे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील आदी उपस्थित होते.
नॉन कोविडसाठी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय तसेच मोहाडी महिला रुग्णालयात नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी
सांगितले़
रुग्णांना अद्यापही जागेवर सुविधा नाहीत
अत्यव्यस्त रुग्णांना जागेवर सुविधा मिळत नसल्याने त्यांना उठून स्वच्छतागृहात जावे लागत आहे़ अशा स्थितीत काही रुग्णांचा मृत्यू झाला़ यासाठी बेड असिस्टंट नेमणार होतो, मात्र,कोणीही यायला तयार नसल्याचे अधिष्ठाता डॉ़ रामानंद यांनी सांगितले़ काही सामाजिक संस्थांकडून सहा लोक येतील, असे ते म्हणाले़
चार ते पाच रुग्ण निगेटीव्ह असून पॉझिटीव्ह
चार ते पाच रुग्णांच्या बाबतीत त्यांना पॉझिटीव्ह म्हणून आधी दाखल करण्यात आले़ त्यांच्या परिवाराला रुग्णालयात आणण्यात आले व दुसऱ्या दिवशी तुमचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे असे सांगून घरी सोडण्यात आले़ हा गंभीर प्रकार असून आपल्याकडे अशा रुग्णांची नावे आहेत, असा गौप्यस्फोट करीत या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली़
असे आहे मृत्यूचे विश्लेषण
५० वर्षावरील १७० रुग्ण
११२ रुग्णांना विविध व्याधी
४७ रुग्ण ७१ वर्षाच्या पुढील
७० रुग्ण हे ५१ त ६० वयोगटातील
५३ रुग्ण हे ६१ ते ७० वयोगटातील
आधी महापालिकेच्या निविदांचे बोला: पालकमंत्र्यांनी आमदारांना थांबविले
आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेसंदर्भात कोविड उपाययोजनांच्या निधीबाबत विचारणा करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना थांबवत 'महापालिकेत तुमची सत्ता असताना तुमचे सभापती तीन- तीन वेळा टेंडर रद्द करतात' त्याबाबतही बोला़ असा टोला लगावला़ यानंतर आयुक्त सतिष कुलकर्णी यांनाही पालकमंत्र्यांनी निविदांबाबत सविस्तर विचारणा केली़ या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सेना- भाजपचे राजकारण चांगलेच रंगलेले आहे़

Web Title: Do you just want to do kirtan in meetings? - Anger of people's representatives in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव