शासन तुला मनपावर भरोसा नाय का..? - जळगावात विरोधकांकडून खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:54 PM2019-08-04T12:54:45+5:302019-08-04T12:55:09+5:30

नगरोथ्थानच्या कामावरुन शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना घेतले धारेवर

Do you trust the Municipal Corporation? - Humor from opponents in Jalgaon | शासन तुला मनपावर भरोसा नाय का..? - जळगावात विरोधकांकडून खिल्ली

शासन तुला मनपावर भरोसा नाय का..? - जळगावात विरोधकांकडून खिल्ली

Next

जळगाव : नगरोथ्थान अंतर्गत मनपाला मिळालेल्या १०० कोटींपैकी मंजूर करण्यात आलेल्या ४२ कोटी रुपयांची कामे सार्वजनिक विभागाकडून करण्यात येत असल्याचा मुद्यावरून शनिवारी झालेल्या महासभेत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महासभेत शिवसेना नगरसेवकांनी ‘शासन तुला मनपावर भरवसा नाय का?,शासन तुला तुझ्या भाजपाच्याच नगरसेवकांवर भरवसा नाय का? असे म्हणत भाजपा नगरसेवकांची चांगलीच खिल्ली उडवली.
मनपाची शनिवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
महासभेच्या विषयपत्रिकेवरील १८ विषयांपैकी दोन विषय तहकूब ठेवून १६ विषय मंजूर करण्यात आले. तसेच आयत्यावेळी आलेल्या तीन विषयांना देखील मंजुरी देण्यात आली.
मनपा हिश्श्यातील रक्कम आणणार कोठून
सुरुवातीला १०० कोटी रुपयांच्या निधीतून ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे शिवसेनेचे नितिन लढ्ढा यांनी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र,शासनाने ४२ कोटी दिले असले तरी हा निधी खर्च करण्यासाठी मनपाला आपल्या हिश्श्यातून १२ कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने हा खर्च कोठून आणणार असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. १०० कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मनपाला नगरोथ्थानच्या नियमाप्रमाणे ३० कोटी द्यावे लागणार असून, मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपला हिस्सा कसा देणार ? हा प्रश्न महासभेत उपस्थित केला. त्यावर नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांनी हा निधी शासनाकडून मिळणार असून, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे सक्षम असल्याचे सांगितले.
ट्रॅफीक गार्डनच्या जागेवर तयार होणार जिल्हा न्यायालयाची नवी इमारत
शासन मालकीच्या मात्र मनपाचे आरक्षण असलेल्या ट्रॅफीक गार्डनवर जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत तयार करण्यासाठी ही जागा मिळावी याबाबतचा प्रस्ताव जिल्हा न्यायालयाकडून मिळाला होता. या प्रस्तावला महासभेने मंजुरी दिली. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेचे नगरसेवक इबा पटेल व एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी विरोध केला. ही जागा स्वातंत्र्यसेनानी मीर शुकूल्लाह यांचे नाव देण्यात आल्याने याठिकाणी उद्यान तयार करण्याची मागणी त्यांनी केली किंवा त्या जागेला मीर शुकूल्लाह यांचे नाव देण्याची मागणी केली.
भंगार बाजार कारवाई पुन्हा रखडली
भंगार बाजार ९९ वषार्साठी भाडेकरारावर देण्याचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, याबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. दरम्यान, भंगार बाजाराबातचा हाच प्रस्ताव मार्च महिन्यात झालेल्या महासभेपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, तेव्हा देखील हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा समिती स्थापन करण्याचा नावावर भंगार बाजाराला अभय दिल्याचेच दिसून आले. अ‍ॅड. शुुचिता हाडा यांनी मनपाची जागा रेडक्रॉस सोसायटीजवळ असून त्याबाबत प्रशासनाचे लक्ष नसल्याचे सांगितले ती जागा ताब्यात घेण्याचा विषयाला मंजुरीदेण्यात आली. तसेच अशा अनेक मनपाच्या जागा असून त्या शोधून ताब्यात घेणे व त्यातून उत्पन्न मिळविण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्याची सूचना त्यांनी मांडली. यावेळी नितिन लढ्ढा यांनी मेहरुण येथिल घरकुलासाठी संपादित जागेचा मोबदला देवून देखील जमिन मालकाने काही भाग कब्जा ठेवला असल्याचे सांगीतले. एलईडीच्या बोगस कारभारबाबत मक्तेदाराला नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याला १७ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली.
बांधकाम विभागाकडे कामे सोपविल्याने सत्ताधारी-विरोधक भिडले
१ आॅगस्ट रोजी जाहीर केलेल्या निर्णयात मनपासाठी मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतील कामे मनपाकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्याने नितीन लढ्ढा यांनी आक्षेप घेतला. तसेच ही कामे मनपाअंतर्गत करण्यात आली तरच त्यावर नियंत्रण ठेवता येवू शकते असे सांगितले.
याआरोपानंतर भाजपा नगरसेवक आक्रमक झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यातच शिवसेनेचे प्रशांत नाईक यांनी शासन तुला मनपावर भरोसा नाही का ? हे गीत सुरु करत व त्या गीताला इतर सेना नगरसेवकांनीही साथ दिल्याने सत्ताधाºयांची चांगलीच खिल्ली उडविली.
भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांनी कामे मनपाकडून होवोत की बांधकाम विभागाकडून कामे होणे महत्वाचे असल्याचे सांगत, मनपाकडून होणाºया कामांमध्ये तुमचा रस असल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेना सदस्य आणखीनच आक्रमक झालेले दिसून आले.

Web Title: Do you trust the Municipal Corporation? - Humor from opponents in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव