खराब रस्त्याने डॉक्टरला फटका

By admin | Published: February 18, 2017 01:01 AM2017-02-18T01:01:48+5:302017-02-18T01:01:48+5:30

पिंप्राळा रस्त्यावरील घटना : डोक्याला मार बसल्याने महिनाभरापासून उपचार

A doctor with a bad road hit | खराब रस्त्याने डॉक्टरला फटका

खराब रस्त्याने डॉक्टरला फटका

Next

जळगाव : पिंप्राळ्यातील दांडेकरनगरातील रहिवासी व जिल्हा परिषदेचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पांडुरंग सोमकुंवर (75, रा. पिंप्राळा)  हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्समध्ये जात असताना शिवकॉलनी उड्डाणपुलाखालील पिंप्राळा रस्त्यावर दुचाकीवरुन घसरुन पडल्याने जखमी झाले. गेल्या महिनाभरापासून ते कोमात असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्ग व परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरुच आहे. खराब रस्त्याचा फटका डॉ.सोमकुंवर यांना बसला. रात्रंदिवस या रस्त्यावरुन वाहतूक सुरु असते. असे असतानाही मनपातर्फे या रस्त्याकडे दुर्लक्ष कायम आहे.
निवृत्तीनंतरही सेवा
डॉ. विजय सोमकुवर हे जि.प.मधून निवृत्त झाल्यानंतर गोळवलकर रक्तपेढीत रक्त        संक्रमण अधिकारी म्हणून काम करीत                 होते. त्यानंतर आता ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्समध्ये रुग्णसेवा करीत. सेवाभाव जपण्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतरही रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे.
धोकादायक रस्ता, वारंवार अपघात
पिंप्राळा परिसरातील या उड्डाणपुलाखालील हा रस्ता धोकादायक असून यापूर्वीही देखील तेथे अनेक अपघात झालेले आहे. बजरंगपुलापासून तर पिंप्राळार्पयतच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून खडी पसरल्याने अपघातास निमंत्रण मिळते. या पूर्वीदेखील याच ठिकाणी एक कार खांबावर धडकली होती तर पुलावरून एक रिक्षा थेट खाली कोसळली होती. महामार्ग टाळून येण्या-जाण्यासाठी हा चांगला पर्यायी मार्ग आहे. मात्र त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावर अपघात सुरूच असतात.

दुचाकी घसरल्याने अपघात
पिंप्राळा येथे दांडेकरनजीक कुटुंबियांसह राहणारे डॉ. सोमकुवर हे नेहमी प्रमाणे  12 जानेवारी रोजी सकाळी  राहत्या घरून कामावर जात होते. त्यावेळी शिवकॉलनी उड्डाणपुलाखाली त्यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्या वेळी काही नागरिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविले. तेव्हापासून ते बेशुद्धच आहे. या बाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. 13 रोजी त्यांना दुस:या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
वडील कामावर जात असताना ते उड्डाणपुलाच्या खाली  दुचाकीवरून पडल्याने त्यांना मार लागला. त्यावेळी त्यांना नागरिकांनीच खाजगी रुग्णालयात दाखल केले.
-डॉ. आशिष सोमकुंवर, डॉ.विजय यांचे पूत्र

Web Title: A doctor with a bad road hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.