मोबाइल बंद करून डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:04+5:302020-12-12T04:33:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाबळ परिसरातील डॉ. विद्याधर लिलाधर पाटील (३८) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

Doctor commits suicide by turning off mobile | मोबाइल बंद करून डॉक्टरची आत्महत्या

मोबाइल बंद करून डॉक्टरची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाबळ परिसरातील डॉ. विद्याधर लिलाधर पाटील (३८) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा नांदेड येथील डॉ. विद्याधर लिलाधर पाटील हे मूळ रहिवासी आहेत. ते हल्ली महाबळ येथे पत्नीसह वास्तव्यास आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून त्यांची नियुक्ती होती. तर त्यांची पत्नी नागपूर येथे आरोग्य विभागात नोकरीस आहे. पत्नी नागपूरला असल्याने डॉ. पाटील हे घरी एकटेच होते. डॉ. पाटील यांचा मोबाइल दोन दिवसांपासून बंद येत होता, तसेच त्यांच्या घराचा दरवाजादेखील बंद असल्याने नातेवाइकांनी त्यांच्या घरी जावून पाहणी केली असता, पाटील यांनी छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.

डॉ. विद्याधर पाटील हे पूर्वी बीव्हीजेत नोकरीस होते. वर्षभरापूर्वी त्यांची बदली शासकीय रुग्णालयात झाली असून, ते १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत डॉक्टर आहेत. डॉ. पाटील यांनी आत्महत्या करण्याइतपत टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.

Web Title: Doctor commits suicide by turning off mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.