जळगावात तीनच महिन्यात डॉक्टर मोरेंनी जिंकली कर्मचा:यांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:44 PM2017-09-12T23:44:38+5:302017-09-12T23:44:38+5:30
जळगाव जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभाग सुन्न : 2009 नंतर मिळाले होते कायम अधिकारी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12 - जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील राज्य शासनाच्या कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.अरविंद सुपडू मोरे (वय 56) यांचा धारदार करवतीने गळा चिरुन खून झाल्याची थरारक घटना सोमवारी उघड झाल्यानंतर दुस:या दिवशीही जिल्हा रुग्णालय परिसरातील कुष्ठरोग विभाग सुन्न होता. सर्वांमध्ये रमणारे व कर्मचा:यांसोबत जेवण करणारे मनमिळावू अधिकारी गेल्याने कर्मचा:यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तीन महिन्यात त्यांनी सर्वाची मने जिंकली होती.
2009पासून कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकाचा पदभार हा प्रभारी अधिका:यांकडे होता. जून महिन्यात डॉ. मोरे यांच्या रुपाने येथे कायम अधिकारी मिळाले होते. मात्र त्यांचा खून झाल्याने या विभागातील कर्मचा:यांना धक्का बसला आहे.
मनमिळावू अधिकारी गेल्याने त्यांच्या आठवणींनी व त्यांची खुर्चीही रिकामी असल्याने कंठ दाटून येत असल्याचे कर्मचारी म्हणाले. त्यामुळे डॉ. मोरे यांच्या दालनाचा दरवाजा मंगळवारी बंद करुन ठेवला होता.
डॉ. मोरे यांनी कर्मचा:यांवर कधीही अधिकार गाजविला नाही, असे येथील कर्मचा:यांनी सांगितले. कर्मचारी जेवण करीत असताना त्यांनी डॉ. मोरे यांना जेवणाचे म्हटले तर ते कधीही नाही म्हटले नाही व किमान दोन घास तरी ते कर्मचा:यांसोबत हसत-खेळत घेत असत. डॉ. मोरे हे वरिष्ठ अधिकारी असले तरी ते कधीच कोणाशीही चढय़ा आवाजात न बोलता सर्वांशी नम्रपणे, प्रेमाने बोलत होते, असे कर्मचा:यांनी सांगून डॉ. मोरे यांचा सर्वजण मोठा आदर, सन्मान करीत होते, असेही कर्मचा:यांनी जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभागात भेट दिली असता सांगितले.