जळगाव शहरातील डॉक्टर्स २४ तासासाठी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:19 PM2019-06-17T16:19:36+5:302019-06-17T16:24:18+5:30
कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी संप पुकारला. सोमवारी सकाळी पहाटे ६ वाजेपासून मंगळवार सकाळी ६ वाजेपर्यंत हा संप असणार आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे.
जळगाव : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी संप पुकारला. सोमवारी सकाळी पहाटे ६ वाजेपासून मंगळवार सकाळी ६ वाजेपर्यंत हा संप असणार आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचा-यांच्या संरक्षणार्थ कायदे करण्यात यावे, डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत, हल्ला करणाºयांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकाता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी, अशा विविध मागण्या आयएमए संघटनेने यावेळी मांडल्या.
शहरातील व.वा. वाचनालयाजवळ असलेल्या डॉ.जे.जी.पंडित आय.एम.ए. हॉल येथील कै.डॉ. दावलभक्त सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या वतीने कोलकत्ता येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ बैठक घेण्यात आली. या वेळी सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी कुठलाही हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही आणि कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यास तात्काळ आपल्याला संपर्क करावा असे आवाहन केले. अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी ,डॉ.प्रताप जाधव,डॉ विलास भोळे, डॉ.अर्जुन भंगाळे डॉ.सुदर्शन नवाल आदींनी देखील घटनेचा निषेध करत न्याय मिळावा अशी मागणी केली.
यावेळी व्यासपीठावर सचिव सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, महाराष्ट्र पदाधिकारी डॉ.अनिल पाटील, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी डॉ. प्रताप जाधव, माजी सचिव डॉ. विलास भोळे आणि डॉ. राजेश पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. चं्रशेखर सिकची, डॉ. सुनील नहाटा यांच्यासह शहर व जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य उपस्थित होते.
सभेनंतर डॉक्टरांकडून घोषणाबाजी
डॉक्टरांची निषेध सभा संपल्यानंतर आय.एम.ए.सभागृहाबाहेर 'डॉक्टरांचा जीव वाचवा ','दोषींना शिक्षा झालीच पाहिजे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी डॉक्टरांच्या हातात कोलकाता येथील घटनेचा निषेध फलक होता.रविवारीदेखील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध म्हणून आय.एम.ए.हॉल येथे रक्तदान करीत गांधीमार्गाने निदर्शन केले.