डॉक्टरांचा बंद : जळगावात गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:38 PM2018-07-29T12:38:55+5:302018-07-29T12:39:58+5:30

‘एनएमसी’चा डॉक्टरांकडून निषेध

Doctor's closure: Treatment done by doctors at Jalgaon | डॉक्टरांचा बंद : जळगावात गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी केले उपचार

डॉक्टरांचा बंद : जळगावात गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी केले उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच हजार डॉक्टरांचा सहभागबैठकीत निषेध

जळगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विरोधात शनिवार, २८ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये जळगाव शहरातील ६०० तर जिल्ह्यातील २५०० डॉक्टरांनी सहभाग नोंदवित वैद्यकीय सेवा बंद ठेवली. या दरम्यान मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी उपचार केले. शहरातील आयएमए पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) या विधेयकाचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विरोधात देशभरात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बंद ठेवली. बंद बाबत अगोदरच घोषणा करण्यात आल्याने रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्याही तशी कमीच होती. मात्र या दरम्यान अचानक प्रकृती खालावलेल्या गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा म्हणून उपचार करीत वैद्यकीय सेवेचा वसा जपला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्याही न वाढल्याचे दिसून आले. संध्याकाळी सहा वाजेनंतर वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली होती.
बैठकीत निषेध
बंद दरम्यान सकाळी ९ वाजता आयएमए पदाधिकाºयांची बैठक होऊन त्यामध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा (एनएमसी) निषेध नोंदविण्यात आला. या वेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. अनिल पाटील, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आयएमए सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान लेह लडाख येथे पर्यटनास गेले असताना अपघातग्रस्तांचा जीव वाचविणाºया डॉ. धीरज चौधरी, डॉ.नितीन खडसे, डॉ.दीपक पाटील, डॉ.विरेंद्र झांबरे, डॉ.नीलेश चौधरी व जम्मू काश्मिर येथे सामाजिक कार्य करणारे डॉ.धर्मेंद्र पाटील यांचा अध्यक्ष डॉ.किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, सचिव डॉ.विलास भोळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Doctor's closure: Treatment done by doctors at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.