पिलखोड ग्रामपंचायतीतर्फे डॉक्टर डे व कृषी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:14+5:302021-07-04T04:12:14+5:30
पिलखोड, ता. चाळीसगाव : पिलखोड येथे ग्रामपंचायतीमार्फत डॉक्टर दिनानिमित्त व कृषी दिनानिमित्त गावातील सर्व डॉक्टर व आदर्श शेतकरी यांचा ...
पिलखोड, ता. चाळीसगाव : पिलखोड येथे ग्रामपंचायतीमार्फत डॉक्टर दिनानिमित्त व कृषी दिनानिमित्त गावातील सर्व डॉक्टर व आदर्श शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्येष्ठ डॉक्टर डॉ. निकुंभ, डॉ. अमृतकर व गावातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर व सर्व मेडिकल दुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी या योद्ध्यांनी कोरोना काळात विशेष कामगिरी केल्याबद्दल सरपंच प्रकाश यशोद, उपसरपंच गोकुळ बाविस्कर व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषी दिनानिमित्त माजी सरपंच उमराव पाटील, बाप्पूराव बाविस्कर, गोकुळ बाविस्कर, दत्तात्रेय माळी, भैया पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य सेवक हेमंत पवार, डॉ. अमृतकर यानी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक आमृतकर होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी जयवंत येवले यांनी केले.