डॉक्टर्स डे : अविरत रुग्णसेवेबद्दल ज्येष्ठ डॉक्टरांप्रती कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:33 PM2018-07-01T12:33:43+5:302018-07-01T12:34:32+5:30
जळगावात ३२ ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान
जळगाव : गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून रुग्णसेवा करणाऱ्या शहरातील ३२ ज्येष्ठ डॉक्टरांंचा डॉक्टर्स डेनिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्यावतीने हा कृतज्ञता सोहळा १ रोजी आयएमए सभागृहात होत आहे.
रुग्णांसाठी ‘देव’ मानले जाणारे डॉक्टर रुग्णसेवेचे व्रत घेत आपल्या कौशल्याद्वारे अनेकांना मृत्यूच्या दाढेतूनही बाहेर आणतात. अशाच प्रकारे गेल्या चार दशकांपासून अनेकांना जीवदान देणाºया ज्येष्ठ डॉक्टरांच्या सेवेचा गौरव व्हावा या उद्देशाने यंदाचा डॉक्टर्स डे त्यांच्यासाठी खास ठरविण्याचा मानस आयएमएने केला आहे.
या डॉक्टरांचा सन्मान
डॉ. नरेंद्र दोशी (फिजिशियन), डॉ. जयाजीराव मुळीक (नेत्रेरोग तज्ज्ञ), डॉ. उल्हास कडूसकर (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. सुभाष चौधरी (फिजिशीयन), डॉ. चंद्रशेकर सिकची (बालरोग तज्ज्ञ), डॉ. गंभीरराव पाटील (जनरल प्रॅक्टीशनर), डॉ. प्रकाश कोचर (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. अशोक दातार (कान, नाक, घसा तज्ज्ञ), डॉ. शामला दातार (जनरल प्रॅक्टीशनर), डॉ. बाळासाहेब चिकोडी (जनरल सर्जन), डॉ. ए.एन. जोशी (फिजिशियन), डॉ. सुमन आठवले (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. विजय दावलभक्त (सर्जन), डॉ. सागर न्याती (त्वचा रोग तज्ज्ञ), डॉ. कृष्णा पाटील (फिजिशियन), डॉ.इंदिरा चौधरी (जनरल प्रॅक्टीशनर), डॉ. सुधीर शहा (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. श्रीराम कुलकर्णी (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. मार्तंड राणे (सर्जन), डॉ. शरद केळकर (सर्जन), डॉ. सुनंदा केळकर (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. भागवत राणे (त्वचा रोग तज्ज्ञ), डॉ. भागवत महाजन (जनरल प्रॅक्टिशनर), डॉ. सुभाष बेंडाळे (सर्जन), डॉ. अरुणा पाटील (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. रमेश चौधरी (कान, नाक ,घसा तज्ज्ञ), डॉ. पांडुरंग पाटील (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. हरिशचंद्र पाटील (बाल रोग तज्ज्ञ), डॉ. शांतीलाल जैस्वाल (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. शशिकला जावळे (भूल तज्ज्ञ), डॉ. शांताराम सोनवणे (जनरल प्रॅक्टिशनर), डॉ. विवेकानंद कुलकर्णी हिपॅटॉजिस्ट), डॉ. जी.पी. रोटे (भूलतज्ज्ञ). यामधील जे डॉक्टर वयामुळे चालू फिरु शकत नाही, अशा डॉक्टरांचा त्यांच्या घरी जाऊन आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. विलास भोळे, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. अनुप येवले हे सत्कार करणार आहेत.
रक्तदान शिबिराने कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांच्या सत्कारासह डॉक्टरांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, कोल्ड स्टोरेज बॉक्सचे उद््घाटन संध्याकाळी होणार असल्याचे डॉ.विलास भोळे यांनी सांगितले.