डॉक्टरांचा परिवारही पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:19 AM2020-06-06T11:19:40+5:302020-06-06T11:19:52+5:30
जळगाव : शहरातील खाजगी डॉक्टर आणि त्यांचा परिवार कोरोना बाधित आढळून आला आहे. ते पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी शुक्रवारीच ...
जळगाव : शहरातील खाजगी डॉक्टर आणि त्यांचा परिवार कोरोना बाधित आढळून आला आहे. ते पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी शुक्रवारीच रवाना झाले आहेत.
डॉक्टर आणि त्यांच्या परिवाराचे तपासणी अहवाल येताच त्यांनी पुण्यात उपचार घेणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने त्यांना परवानगी दिल्याची माहिती मिळाली.
याशिवाय जिल्ह्यातील एक माजी आमदारही मुंबईत उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, शहरातील रुग्ण संख्या आता २०६ झाली आहे.
तर जवळपास ५० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती शासकीय पत्रकात देण्यात आली आहे. तसेच जवळपास ४० रुग्ण अत्यवस्थ असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रोज देण्यात येणाऱ्या पत्रकात जनमानसातून सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे अहवाल आल्यास सर्वांसाठी ते सोयीचे ठरणार आहे.
-एकूण रुग्ण संख्या कोरोना बाधित-
पुरुष -
महिला -
-रुग्णांचे वय
वय १ दिवस - १८ वर्र्षे
१८ -४५
४६ -६०
६०+
-टोटल हॉस्पिटल बेड कॅपसिटी (क्षमता)-
-टोटल नंबर्स आॅफ बेडस् (आक्यूपाईड)
-रिक्त असलेले बेडस्
-अतिदक्षता विभागातील रुग्ण (सिरीयस)-
-आॅन व्हेंटिलेटर-
-आॅन आॅक्सिजन-
-मध्यम लक्षण असलेले रुग्ण-
-सौम्य लक्षण असलेले रुग्ण-
-ससपेकटेड (संशयित) रुग्ण-
-आज कोरोना ओ. पी.डी तील संख्या-
-आज दाखल केलेले रुग्ण-
-एकूण सॅम्पल पेंडिंग-
-आज आलेले रिपोर्टस-
-आज पाठवलेले सॅम्पलस-
-डेथ रिपोर्ट्स-
-आज ब्रॉथ डेथ रुग्ण-
-हॉस्पिटलमध्ये डेथ (आॅन ट्रीटमेंट)
-मृत्यूचे कारण-