डॉक्टरांची जीवनशैली व ढासळते आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:23 PM2019-06-04T12:23:25+5:302019-06-04T12:24:11+5:30

परवाच डॉ.नीलेश शिंपी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. खरे तर ...

Doctors' lifestyle and degradation health | डॉक्टरांची जीवनशैली व ढासळते आरोग्य

डॉक्टरांची जीवनशैली व ढासळते आरोग्य

Next

परवाच डॉ.नीलेश शिंपी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. खरे तर आयुष्यभर आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या आणि आरोग्य विषयक सल्ला देणाºया डॉक्टरांचे आरोग्य उत्तम असायला हवे, पण तसे नाही. सामान्य जनतेपेक्षा डॉक्टरांचे सरासरी आयुष्यमान १० वर्षांनी कमी आहे. दिव्याखाली अंधार यावर गंभीर विचार करण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांना आहे. कामाचे अतिरिक्त तास, अवेळी खाणे, अवेळी झोपणे, व्यवसायातील ताणतणाव, कर्जाचे हप्ते ही तर मुख्य कारणे आहेतच. त्याबरोबर पैशांचा अतिहव्यास, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार आणि व्यसने हेसुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत. हल्ली डॉक्टर आणि रुग्ण यातील सुसंवाद बराच बिघडलेला आहे. त्यातून निर्माण होणार ताणतणाव दोघांना घातक आहे. चाळीस वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ व्यवसायात मला जे अनुभव आले त्यावरून माझ्या व्यवसाय बंधू-भगिनींना काही नम्र सूचना करू इच्छितो. आपला व्यवसाय याप्रमाणे नियंत्रित करा की रोजचे काम आठ तासांपेक्षा जास्त होणार नाही. या प्रक्रियेत पैसा कमी मिळेल, काही रुग्ण नाराज होतील, पण डॉक्टरांनी आपले आरोग्य चांगले ठेवले तरच त्यांना पेशंटचे आरोग्य चांगले ठेवता येईल. ठरलेल्या तपासणीच्या वेळेव्यतिरिक्त कोणी आल्यास इर्मजन्सी सर्व्हीस आपल्याला द्याव्याच लागतात. पण सवडीप्रमाणे लोक येतात आणि आपली शिस्त बिघडवितात. त्यांना थोडी शिस्त लावा. चोवीस तास सेवा एकट्या डॉक्टरांना देणे शक्य नाही. एखाद्या आयसीयुशी टाय-अप करा. आयसीयुमध्ये जाणाºया सर्व पेशंटना अ‍ॅडमिट करायची गरज नसते. त्याठिकाणी ओपीडी तपासणी आणि उपचार उपलब्ध असतात. आपल्याकडे असलेली उपकरणे आणि आपले ज्ञान यांच्या सीमा ओळखा. ज्यांना आपण योग्य सेवा देऊ शकत नाही त्यांना हायर मेडिकल सेंटरमध्ये पाठवा. सिरीयस पेशंट आपल्याकडे अ‍ॅडमिट करून स्वत:चा ताणतणाव वाढवू नका. रोज सात ते आठ तास शांत झोपा. रोज किमान एक तास व्यायाम करा. तेल, तूप, साखर, मांसाहार शक्यतोवर कमी सेवन करा, वजन नियंत्रित ठेवा. व्यसंनापासून दूर रहा. आपला परिवार, मित्र मंडळी, संगीत, आवड योग्य वेळ द्या. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्या. दर सहा महिन्यांनी परिवार आणि मित्र मंडळीसोबत टूर काढा, योग्य आहार, विहार, विचार करून आपले आयुष्य सुंदर करू या.
- डॉ.विश्वेश अग्रवाल, जळगाव.

Web Title: Doctors' lifestyle and degradation health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव