प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्टर? देता का डॉक्टर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:12+5:302021-03-06T04:16:12+5:30
डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे गंभीर चित्र वर्षानुवर्षे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत ...
डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे गंभीर चित्र वर्षानुवर्षे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत कायम आहेत. अखेर डॉक्टरांची पदे भरण्यासाठी नियम शिथिल करून बीएएमस व कंत्राटी पद्धतीने भरती करून मनुष्यबळाचा मुद्दा सोडविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५६ डॉक्टरपैकी ५२ डॉक्टर हे एमबीबीएस आहेत. मात्र, जागा रिक्त नसल्याचे समाधान मात्र आरोग्य यंत्रणेला आहे.
जिल्ह्यात आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य सेवा सुरळीत मिळावी, ग्रामीण भागात याचे जाळे विस्तारावे यासाठी पूर्ण मनुष्यबळ हा मुद्दा निकाली काढण्याचा आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न होता. मात्र वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस डॉक्टरच उपलब्धच होत नव्हते. अखेर या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणल्यानंतर बीएएमस पदवीधारक डॉक्टरांनाही वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता १०४ बीएएमएस डॉक्टर्स आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र
७७
एमबीएस डॉक्टर्स
५२
रिक्तपदे
०
उपकेंद्रांमध्ये सीएचओ
जिल्ह्यात ३००पेक्षा अधिक उपकेंद्र असून, या उपकेंद्रांमध्ये सीएचओ अर्थात जनसमुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर किमान दोन डॉक्टर राहतील, अशी सुविधा असल्याचे सांगितले जात आहे.
तालुकानिहाय डॉक्टर
अमळनेर : बीएएमएस-१०, एमबीबीएस २
भडगाव : बीएएमएस-८, एमबीबीएस २
बोदवड : बीएएमएस-३, एमबीबीएस १
भुसावळ : बीएएमएस-३, एमबीबीएस ५
चाळीसगाव : बीएएमएस-१२, एमबीबीएस ७
चोपडा : बीएएमएस-१, एमबीबीएस ४
मुक्ताईनगर : बीएएमएस ६, एमबीबीएस २
एरंडोल : बीएएमएस-५, एमबीबीएस १
धरणगाव : बीएएमएस-७ , एमबीबीएस १
जळगाव : बीएएमएस-६, एमबीबीएस ५
जामनेर : बीएएमएस-१०, एमबीबीएस ४
पाचोरा : बीएएमएस-९, एमबीबीएस १
पारोळा : बीएएमएस-४, एमबीबीएस ४
रावेर : बीएएमएस-७, एमबीबीएस ६
यावल : बीएएमएस-५, एमबीबीएस ७