इकडे टाळ्यांचा नाद़़़तिकडे जीवदानासाठी डॉक्टरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:44 PM2020-03-24T12:44:33+5:302020-03-24T12:46:37+5:30

'जनता कर्फ्युु’त अवघड शस्त्रक्रीया यशस्वी, अन्य तिघांना वाचविले

Doctor's side-by-side with life-threatening doctors | इकडे टाळ्यांचा नाद़़़तिकडे जीवदानासाठी डॉक्टरांची साथ

इकडे टाळ्यांचा नाद़़़तिकडे जीवदानासाठी डॉक्टरांची साथ

googlenewsNext

जळगाव : आपत्कालीन स्थितीत शासकीय वैद्यकीय सेवा कशाप्रकारे एखाद्याला जीवदान देऊ शकते, याचा प्रत्यय रविवारी आला़ जनता कर्फ्युुमध्ये सर्व यंत्रणा ठप्प असताना सायंकाळी एकीकडे टाळ्यांचा गजर होत होता तर दुसरीकडे जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून वराडसीम ता. भुसावळ येथील महिलेला जीवदान दिले़ यासह दोन महिला व एका बाळालाही या डॉक्टांराच्या चमूने वाचविले़
वराडसीम येथील साठ वर्षीय महिला सकाळी सुमारास शेतात काम करीत होती़ अचानक या महिलेची गर्भपिशवी थेट अंगाबाहेर फेकली गेली़ हे दृश्य पाहून कुटुंबीय हादरले़ शरीरात विष पसरू नये म्हणून काही महिलांनी तात्पुरते उपचार केले व या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परिस्थिती बिकट असल्याने तत्काळ या महिलेला जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़
तत्काळ रक्त केले उपलब्ध
शासकीय रूग्णालयातील स्त्री रोग विभागप्रमुख डॉ़ संजय बनसोडे, डॉ़ मिताली गोलेच्छा, डॉ़ आकाश कोकरे यांनी या महिलेची प्राथमिक तपासणी केली़ महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव झालेला असल्याने डॉक्टरांच्या या चमुनेच रक्त पिशव्यांची जमवाजमव केली़ अत्यावश्यक असल्याने अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनीही या शस्त्रक्रियेला तत्काळ परवानगी दिली व डॉ़ मिताली गोलेच्छा, डॉ़ आकाश कोकरे, डॉ़ सुधीर पवनकर, डॉ़ शितल ताटे, डॉ़ कोमल तुपसागर यांनी या महिलेवर शस्त्रक्रीया केली़ सुमारे तास चालेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून या डॉक्टरांनी खऱ्या आपत्कालीन स्थितीत या महिलेचे प्राण वाचविले़
असाही योगायोग
जनता कफर्यू दरम्यान, नागरिक सायंकाळी ५ वाजता आपत्कालीन सेवा देणाऱ्यांचे टाळ्या, ताटल्या वाजवून आभार मानत होते़ नेमकी त्याच वेळी ही शस्त्रक्रीया केली जात होती़
अशा स्थितीत सेवा देणाºयांचा खºया अर्थाने हा गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया या शस्त्रक्रियेनंतर कुटुंबीय, डॉक्टर व कर्मचाºयांमधून उमटल्या़
अन्य तिघांना वाचविले
जनता कर्फ्युच्या कालावधीतच झटके आलेल्या दोन महिला व अन्य एका महिलेचे सिझेरियन करून माता व बाळाचे प्राण वाचविण्यात या डॉक्टरांना चमूला यश आले़
रजेनिवृत्तीनंतर गर्भपिशवी बाहेर पडण्याचे प्रमाण नगण्य आहे़ बºयाच स्त्री रोगतज्ज्ञांना असे रूग्ण त्यांच्या आयुष्यात पाहण्यास मिळत नाही, अशा दुर्मिळ केसमध्ये निदान व श्स्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समाधान आम्हाला आहे़ कर्फ्यू म्हणजे ह्यकेअर फॉर यूह्ण आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत़
- डॉ़ संजय बनसोडे, विभागप्रमुख स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग.

Web Title: Doctor's side-by-side with life-threatening doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव