चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:34 PM2019-08-02T16:34:32+5:302019-08-02T16:36:11+5:30

सायगाव येथे डॉ.तुषार ठाणसिंग अहिरे (वय ४०) यांनी शुक्रवारी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आत्महत्या केली.

Doctor's suicide at Saigao in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे डॉक्टरची आत्महत्या

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे डॉक्टरची आत्महत्या

Next
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अज्ञातआत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठीजबाबदार कोणालाही धरू नयेबँकेचे पैसे कुटुंबियांना देण्यात यावे

सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथे डॉ.तुषार ठाणसिंग अहिरे (वय ४०) यांनी शुक्रवारी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आत्महत्या केली.
राहत्या घरात सरीला दोर बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. त्यांच्या पायाखाली स्टीलचा मोठा डबा होता. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये बडोदा बँकेत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर पैसे असून, ते पैसे पत्नी, मुली, आई-वडील, भाऊ तसेच बहिणीचा मुलगा व मुलींच्या लग्नासाठी १०-१० हजार रुपये माझ्या नावाने देण्यात यावेत. मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे. या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत लिहून ती पलंगावर ठेवली होती. डॉ.तुषार अहिरे मूळचे अस्ताने, ता.मालेगाव येथील रहिवाशी आहेत. ते सायगाव येथे गेल्या सात-आठ वर्षांपासून वास्तव्यास होते. ते सायगाव येथून मळगाव व गिरणा डॅम येथे व्हिजीटला जात होते. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याजवळ नव्हत्या. त्या शिरपूर येथे माहेरी गेल्या होत्या व त्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्याजवळ राहत नव्हत्या, अशी माहिती समजली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, एक बहीण, आई-वडील असा परिवार आहे. पंचनामा मेहुणबारे येथील पो.कॉ.गोरख चकोर यांनी केला. डॉ.तुषार अहिरे यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Doctor's suicide at Saigao in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.