आयोगाच्या नकारानंतरही पुरविली गेली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:47 PM2020-08-11T12:47:06+5:302020-08-11T12:47:27+5:30

महिला अधिकाऱ्यांचा तक्रारीत आरोप : प्रशासनातील ‘ते’ हितशत्रू कोण?

Documents provided even after the Commission's refusal | आयोगाच्या नकारानंतरही पुरविली गेली कागदपत्रे

आयोगाच्या नकारानंतरही पुरविली गेली कागदपत्रे

googlenewsNext

जळगाव : माहिती अधिकार कायद्यांतर्गत काही माहिती पुरविण्यास केंद्रीय आयोगाने स्पष्टपणे नकार दिल्यानंतरही प्रशासनातील काही हितशत्रूंनी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्याशी संगनमत करुन त्यांना कागदपत्रे पुरविली असल्याचे महिला अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्याविरुध्द दिलेल्या विनयभंग व खंडणीच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीत तथ्य असेल तर महसूल विभागात या महिला अधिकाºयांचे ते हितशत्रू कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
महिला अधिकारी व दीपक गुप्ता यांच्यातील तक्रारीच्यानिमित्ताने महसूल विभागातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. प्रशानातील काही हितशत्रू हे दीपक गुप्ता यांना मिळाले असून त्यांनीच कार्यालयीन गोपनीय कागदपत्रे गुप्ता यांना पुरविले असून या कागदपत्रांच्या आधारावरच गुप्ता आपली बदनामी करीत असल्याचा उल्लेख अधिकाºयांनी तक्रारीत केला आहे. आपल्यावर कुठलेही आरोप सिध्द झालेले नसताना समाज, जनमानसात व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांमध्ये बदनामी होण्याच्या उद्देशाने गुप्ता हे कागदपत्रे सोशल मीडियावर अपलोड करीत आहे. या मागील उद्देश खंडणी मागण्याचाच असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
एप्रिल महिन्यातही गुप्तांविरुध्द तक्रार
राष्टÑीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य मिळावे यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी काही जणांनी जोरजोराने आरडाओरड व लोकांना भडकावून तहसीलदारांना धक्काबुक्की करुन व्हीडीओ चित्रण केल्याचा आरोप होता. त्यातील शेख युनुस शेख अजिज (३२, रा.उस्मानिया पार्क, जळगाव) व कैलास महारु सोनवणे (५०, रा.मोहाडी, ता.जळगाव) या दोघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तहसीलदारानीच स्वत: फिर्याद दिली होती. त्याच प्रकरणात तहसील कार्यालयात गर्दी करुन संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्यासह १५० ते २०० जणांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात झाला होता. निवासी नायब तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांनी फिर्याद होती.

गुप्तांविरुध्द दीड महिन्यातील दुसरा गुन्हा
दीपक गुप्ता यांच्याविरुध्द दीड महिन्यात शहर पोलीस ठाण्यात हा दुसरा गुन्हा दाखल झाला. याआधी २० जून रोजी वाळू व्याससायिकाडून १ लाख ७० हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात विठ्ठल भागवत पाटील (३२, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली. आता ७ जुलै रोजी सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट टाकणे व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांपैकी एकाही गुन्ह्यात गुप्ता यांना अटक झालेली नाही. दरम्यान, महिला अधिकाºयांच्या या तक्रारीत गुप्ताविरुध्द याआधी जळगाव, धुळे, नाशिक, सीबीडी नवी मुंबई व पुणे पोलिसात अश्लिल शेरेबाजी केल्याचे गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख आहे. या गुन्ह्यांमध्ये गुप्ता यांना अटक झाली होती.

Web Title: Documents provided even after the Commission's refusal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.