कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:24+5:302021-07-17T04:14:24+5:30
सचिन देव जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनामुळे बंद असलेल्या अनेक एक्सप्रेस गाड्या टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ...
सचिन देव
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनामुळे बंद असलेल्या अनेक एक्सप्रेस गाड्या टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या एक्सप्रेस गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. मात्र, दुसरीकडे दीड वर्ष उलटल्यानंतही रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाचे कारण सांगून, भुसावळ विभागातील एकही पॅंसेंजर गाडी सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे
गेल्या महिन्यात शासनाने ॲनलॉक केल्यानंतर परप्रांतीय बांधव रोजगारासाठी पुन्हा महाराष्ट्रात येऊ लागल्याने, रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. तसेच अनलॉकमुळे रेल्वे प्रशासनाने स्थगित केलेल्या गाड्या पुन्हा सुरू केल्यामुळे, प्रवाशांची अधिकच गर्दी वाढली आहे. एकीकडे या एक्सप्रेस गाड्यांना प्रचंड गर्दी असतांना, दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून, अद्यापही एकही पॅसेंजर सुरू केलेली नाही. एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी होत असतांना, त्या ठिकाणी कुठलेही सोशल डिस्टनिंगचे पालन केले जात नाही. मात्र, पॅसेंजर सुरू केल्यामुळे गर्दीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर प्रवाशांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ईन्फो :
सध्या सुरू असलेल्या एक्सप्रेस
काशी एक्सप्रेस
कामायानी एक्सप्रेस
हावडा एक्सप्रेस
विदर्भ एक्सप्रेस
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
राजधानी एक्सप्रेस
झेलम एक्सप्रेस
महानगरी एक्सप्रेस
गितांजली एक्सप्रेस
इन्फो :
बंद असलेल्या पॅसेंजरची नावे
- भुसावळ -देवळाली पॅसेंजर
-भुसावळ -मुंबई पॅसेंजर
- भुसावळ-सुरत पॅसेंजर
-भुसावळ-अमरावती पॅसेेंजर
-भुसावळ-नागपूर पॅसेंजर
इन्फो :
एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही
सध्या स्पेशल रेल्वे सुरू असल्यामुळे त्यांचा तिकीट दर जास्त आहे. पूर्वी पेक्षा या स्पेशल ट्रेनला ५० ते १०० रूपयांपर्यंत जास्त भाडे लागते. तसेच आरक्षण ही लवकर होत नाही. त्यामुळे एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही.
योेगेश पाटील, प्रवासी
सध्या एक्सप्रेस गाड्यांना जनरल तिकीट मिळत नसल्यामुळे, तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागतो. मात्र, आरक्षणासाठी पैसे जास्त लागतात. कधी-कधी रेल्वेचे आरक्षण न झाल्यामुळे बसनेही प्रवास करावा लागतो. त्यामुळे एक्सप्रेसचा आणि बसचाही प्रवास परवडत नाही.
तुषार देशमुख, प्रवासी
इन्फो :
रेल्वे बोर्डाच्या सुचनेनुसार सध्या पॅसेंजर सेवा सध्या बंद आहे. रेल्वे बोर्डाच्या सुचनेनुसार या गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील.
युवराज पाटील, सिनिअर डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग