चाळीसगावात डॉक्टर करताय 'जातीयतेवर' अनोखा 'उपचार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:50 PM2018-04-23T22:50:21+5:302018-04-23T22:50:21+5:30

महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण : १४ हजार लोकांशी एकात्मतेचा संवाद

Doing Doctor in Chalisgaon: Unique Treatment on 'Ethnic' | चाळीसगावात डॉक्टर करताय 'जातीयतेवर' अनोखा 'उपचार'

चाळीसगावात डॉक्टर करताय 'जातीयतेवर' अनोखा 'उपचार'

googlenewsNext
ठळक मुद्देपाचोरा आणि भडगाव तालुक्यात घराघरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा हजार प्रतिमांचे वितरण केले.मोठ्या इमारतीच नव्हे तर झोपडीतही महाराजांची प्रतिमा त्यांनी पोहचवली.महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या आठ हजार प्रतिमांचे वितरण

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.२३ : महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी उत्सवांनाही जातीयतेचे रंग दिले जात आहे. दरदिवशी जाती-धर्मावरुन वाद देखील होतात. या विरोधाभासावर प्रहार करतांना डॉ.संजीव पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव तालुक्यात महापुरुषांच्या प्रतिमांचे विनामुल्य वितरण करुन सामाजिक आणि जातीय सलोख्याची नवी 'उपचार पद्धत' सुरु केली आहे. पंचक्रोशीत या सोशल इंजिनिअरींगचे कौतुक होत आहे.
भाजपाच्या जिल्हा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.संजीव पाटील हे समाजाभिमुख उपक्रम राबवित आहे. 'एक कार्यकर्ता, एक झाड' असा हरित उपक्रमही त्यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. मोफत उपचार, वैद्यकीय शिबिरे घेऊन त्यांनी सर्वसामान्यांना वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळवून दिला आहे.
जातीयतेला कृतीतूनच सुरुंग लागू शकतो. हा विचार ज्या महामानवांनी समाजाला दिला. त्यांच्या प्रतिमा घराघरात पोहचविण्यासाठीच उपक्रम सुरु केला. यातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा उपक्रम पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे डॉ.संजीव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: Doing Doctor in Chalisgaon: Unique Treatment on 'Ethnic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.