अनिष्ट चालीरिती बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:40 AM2019-02-04T11:40:58+5:302019-02-04T11:41:03+5:30
बारी समाजाचे महाअधिवेशन
जळगाव : समाजातील अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यात यावी, यासह बारी समाजच्या महाअधिवेश्नात सात ठरावांना मंजूर करण्यात आले.
सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यालगत अखिल भारतीय बारी समाजाच्या शंभराव्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला देशाच्या अनेक भागातून पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड उपस्थिती असताना सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रितीने पार पडले. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या अधिवेशनात देशभरातून सुमारे ५ हजारहून अधिक समाजबांधव उपस्थित होेते.
समाजबांधवांसमोरील आव्हानांवर झाली चर्चा
हे अधिवेशन तीन सत्रांमध्ये पार पडले. सकाळच्या सत्रात अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रात देशभरातून आलेल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत समाजासमोर असलेल्या विविध अडचणी, समाजातील परंपरा, चुकीच्या चालीरितींच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. अखेरच्या सत्रात सात ठरावांना समाजबांधवांनी मान्यता दिली. सुमारे ४ एकर जमिनीवर भव्य मंडप टाकण्यात आला होता.
अधिवेशनात करण्यात आलेले ठराव
च्विविध राज्यांमधील विखुरलेल्या समाजाला एकसंघ व्हावा.
च्आपसातील समज-गैरसमज दूर करून अनिष्ट चालीरितींना आळा घालावा.
च्सर्व भागात रोटी-बेटी व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.
च्जात,उपजात, पोटजात तसेच हलके भारी असा फरक यापुढे बंद करावा.
च्समाजातील तरुणांना नवीन उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्या यावे.
च्एकसंघ होवून शासन दरबारी विविध मागणी व सवलीतींसाठी दाद मागावी.
च्बारी समाजाचे संत रुपलाल महाराज यांना राष्टÑसंत दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा.