इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:37 PM2020-08-28T15:37:24+5:302020-08-28T15:37:59+5:30
यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती.
भुसावळ : यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती.
यासाठी घरच्या बाप्पाचे डेकोरेशन आॅनलाईन मागवण्यात आले होते. एकूण ३५ स्पर्धकांनी यात भाग घेतला. सर्व डेकोरेशनचे परीक्षण प्रोजेक्ट चेअरमन हेमलता सोनार, सदस्य सुनीता पाचपांडे व विनिता नेवे यांनी अध्यक्ष मोना भंगाळे व सचिव रेवती मांडे यांच्या सहकार्याने केले. प्रथम क्रमांक सहकार नगरमधील नीलमणी अपार्टमेंटमधील विशाल पोतदार यांच्या दत्तरुपी गणेश आरासचा, तर राकेश पाटील (लक्ष्मीनगर) यांच्या अष्टविनायक दर्शन आरासचा द्वितीय आणि पूनम कोल्हे (ठोके नगर) यांच्या घरगुती साहित्यापासून कोविड सेंटरचा तृतीय क्रमांक आला. उत्तेजनार्थ बक्षीस श्रेया जोशी (कुलकर्णी प्लॉट), पूनम पाटील (वांजोळा रोड) व सुवर्णा नेवे (तापी नगर) यांना देण्यात आले. पुरस्कार म्हणून आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.