डोनाल्ड ट्रम्प जळगावच्या ‘वरण-बट्टी’च्या प्रेमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 07:44 PM2017-10-31T19:44:39+5:302017-10-31T19:47:19+5:30
गेल्यावर्षी झालेल्या अमेरिकेच्या राष्टपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लीक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. विजयाचे श्रेय त्यांनी अमेरिकन जनतेला न देता चक्क जळगावातील गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळात आयोजित करण्यात येणाºया भंडाºयांना दिले आहे. तसेच त्यांनी जळगाव व असोदा परिसरातील ‘वरण-बट्टी’ व वांग्याच्या भाजीच्या प्रेमात पडले आहेत.
अजय पाटील,
आॅनलाईन लोकमत
जळगाव-दि.३१,गेल्यावर्षी झालेल्या अमेरिकेच्या राष्टपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लीक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. विजयाचे श्रेय त्यांनी अमेरिकन जनतेला न देता चक्क जळगावातील गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळात आयोजित करण्यात येणाºया भंडाºयांना दिले आहे. तसेच त्यांनी जळगाव व असोदा परिसरातील ‘वरण-बट्टी’ व वांग्याच्या भाजीच्या प्रेमात पडले आहेत.
हे वाचून धक्का बसला ना. काही जळगावकर युवकांनी नामी शक्कल लढवित डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणांना जळगावच्या अहिराणी भाषेत डब करून, व्हिडीओ तयार केले आहेत. यामध्ये काही युवकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाज डब केला आहे. त्यात ट्रम्प हे आपल्या भाषणात जळगावच्या ‘वरण-बट्टी व वांग्याची’ भाजीची स्तुती करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ युट्यूब व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशभर पसरले आहे. त्यामुळे या व्हिडीओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
२० ते २५ व्हिडीओ केले तयार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यानचे, विजयी झाल्यानंतरचे व काही पत्रकार परिषदेतील व्हिडीओ डब केले आहेत. ट्रम्प यांचे असे २० ते २५ व्हिडीओ डब करण्यात आले आहेत. तर याखेरीज ‘नरेंद्र मोदी व ट्रम्प’ भेटी दरम्यानचा व्हिडीओ देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी देखील जळगावच्या ‘वरण-बट्टी’चे कौतुक करत असून, भारताने अमेरिकेला ‘वरण-बट्टी’ निर्यात करण्याचा सल्ला देखील ट्रम्प या व्हिडीओत देत आहे. अशा एकाहून एक गंमतीशिर संदेश व्हॉट्सअॅपवर एकमेकांना पोस्ट केले जात आहे.
ख्रिस गेल,जयकांत शिखरेलाही आवडते वरणबट्टी
युट्यूबवर सर्वात जास्त हे व्हिडीओ अपलोड होत असून, डोनाल्ड ट्रम्प सोबतच वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, सिंघम चित्रपटातील जयकांत शिखरे, युवराज सिंग यांचे देखील अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करुन ते देखील वरणबट्टीच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे.