रक्तदान करीत दिव्यांग बांधवांनी दिला सेवाभावचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:08+5:302021-06-16T04:22:08+5:30

जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्राच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी रक्तदान शिबिर आणि प्रथम फळीतील कर्मचारी (फ्रंटलाइन ...

By donating blood, Divyang brothers gave a message of service | रक्तदान करीत दिव्यांग बांधवांनी दिला सेवाभावचा संदेश

रक्तदान करीत दिव्यांग बांधवांनी दिला सेवाभावचा संदेश

Next

जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्राच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी रक्तदान शिबिर आणि प्रथम फळीतील कर्मचारी (फ्रंटलाइन वर्कर) यांना इम्युनिटी किट भेट देण्यात आले. यावेळी रक्तदान करीत सेवाभावचा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, अनिल शिरसाळे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले.

मी स्वत: नियमित रक्तदाता असून, शक्य असेल तेव्हा रक्तदान करतो. दिव्यांग बांधवांचे हे रक्तदान इतर लोकांना खूप प्रेरणादायी आहे, असे गौरोद्गार डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.

याप्रसंगी दिव्यांग बांधवांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकार बंधूना इम्युनिटी किट देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले.

Web Title: By donating blood, Divyang brothers gave a message of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.