निवृत्त शिक्षिकेकडून देणगी व ग्रंथसंपदा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:44+5:302021-07-26T04:14:44+5:30
सुमारे ९२ वर्षे वय असलेल्या वैद्य यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संस्कृतचे अध्यापन करीत विद्यार्थ्यांना सुसंकृत केले. त्या ...
सुमारे ९२ वर्षे वय असलेल्या वैद्य यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संस्कृतचे अध्यापन करीत विद्यार्थ्यांना सुसंकृत केले. त्या सध्या सेवानिवृत्त जीवन जगत आहेत. या वयातील शाळेला भेट देण्याच्या त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून त्यांची शाळेविषयी असलेली आपुलकी जिव्हाळा, हे सर्व थक्क करणारे होते. त्यांच्या वतीने हा धनादेश व ग्रंथसंपदा त्यांचे बंधू पद्माकर खंडेराव वैद्य यांच्या हस्ते संस्थेचे सचिव मिलिंद मिसर यांनी स्वीकारली.
शाळेचे माजी विद्यार्थी सीए अनिल शहा यांनीदेखील गुरू व विद्यार्थी यांच्याविषयी असलेला स्नेह, जिव्हाळा याविषयी माहिती देऊन गुरूंबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी संचालक रोहन मोरे, जगदीश गुजराथी, दिलीप शिरूडकर, उपमुख्याध्यापक व्ही.यू. महाजन, पर्यवेक्षक डी.के. हटकर, एस.ए. वाणी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.जी. शिनकर यांनी केले.
250721\25jal_4_25072021_12.jpg
पारोळा येथील एन. ई. एस. हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका लीलावती वैद्य यांनी संस्थेला ५१ हजारांची देणगी दिली व ग्रँथसंपदा भेट दिली ते स्वीकारताना मिलींद मिसर, सोबत अनिल शहा व रोहन मोरे.