दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:34 PM2018-10-03T15:34:42+5:302018-10-03T15:34:48+5:30
दान हे एक धर्मांचे प्रभावी अंग आहे. सत्प्रवृत्तीचा गृहस्थाश्रमी आपल्या कष्टाच्या कमाईतून काही तरी सत्कारणी लागावे म्हणून सारखा तळमळतो व आपल्या विचारांप्रमाणे यथाशक्ती दान करून माझी कष्टाची कमाई सार्थक झाली.
दातव्यमिती यद्यानं दीपते नुपकारणे
देश कालेच पात्रे तद्यानं सात्विकं स्मृतम ।। गीता अ. १७, श्लोक-२०.
दान हे एक धर्मांचे प्रभावी अंग आहे. सत्प्रवृत्तीचा गृहस्थाश्रमी आपल्या कष्टाच्या कमाईतून काही तरी सत्कारणी लागावे म्हणून सारखा तळमळतो व आपल्या विचारांप्रमाणे यथाशक्ती दान करून माझी कष्टाची कमाई सार्थक झाली. काही तरी सत्कारणी लागली. याने माझ्या आत्म्याचे काही तरी हीत होईल म्हणून समाधान मानतो. कधी काळी यज्ञ, भांडारे, नगर भोजन, ब्राह्म भोज व लग्न मुंजी बंघनादि कार्यात हजारो लोकांच्या पक्ती उठत असत. मठ मंदिर आदी धार्मिक संस्थांना धन, धान्य, शेती दिली जाई. आजकाल भूदान, श्रमदान, संपत्ती दान आदी सारखे दान पुढे येत आहेत. पण या सर्वांच्या बुडाशी आपल्या अंतकरणात रुतलेले धार्मिक संस्कारच होय. दानाच्या सहाय्याने मोठमोठाले महत्त्वाचे राष्ट्रकार्य,धर्म कार्य चालू आहेत. दानाने चांगले कार्य ही केले व करीत आहे व दानाने वाईट कार्य ही केले व अजून ही करीत आहे, जसे या दानाने आळशी, ऐतखाऊ, ठग, राष्ट्रदोषी, धर्मद्रोही, निर्माण केले हे पण नाकारता येणार नाही. ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात टाकतो त्याला तसा आकार येतो. त्याप्रमाणे कार्यकर्ते जसे असतील तसे कार्याला वळण मिळते. त्याचप्रमाणे दान घेणारे व देणारे तसे दानाला स्वरुप प्राप्त होते. म्हणून दान देणारा जाणता असून श्रद्धाळू पाहिजे. निव्वळ धर्मभोळेपणा हानिकारक आहे.
कर्तव्य बुद्धीने कार्याचे महत्त्व ओळखून देणे हे दान होय. त्याला पण तीन अटी आहेत. भगवान श्रीकृष्ण महाराज गीतेच्या १७ व्या अध्यायात सांगतात. १) देश २) काळ आणि ३) पात्र हे पाहून दान करावे. नाही तर केलेले दान व्यर्थ तर होतेच पण नानाविध समाज विघातक दोष उत्पन्न करते.
-लेखक-कै.महंत आराध्य मुरलीधर शास्त्री,
संकलन- वैशाली आराध्य,भुसावळ.