दोंडाईच्यातील चौघांना सक्तमजुरी
By admin | Published: March 18, 2016 12:46 AM2016-03-18T00:46:39+5:302016-03-18T00:46:39+5:30
दोंडाईच्यातील सतीश नगराळे खूनप्रकरणी यांनी गुरुवारी चार जणांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला आह़े,
धुळे : दोंडाईच्यातील सतीश नगराळे खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ कदम यांनी गुरुवारी चार जणांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला आह़े, तर तीन जणांची निदरेष मुक्तता करण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर आरोपींना घेऊन जाणा:या पोलीस गाडीवर किरकोळ दगडफेक झाली. दोंडाईचा एस़एस़व्ही़पी. एस महाविद्यालयाचे आवार व मांडळ रोड चौफुलीजवळ 4 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 3 ते 3़15 वाजेदरम्यान ही घटना घडली होती़ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या मिरवणुकीत तलवारी घेऊन का नाचत होते, असे विचारल्याचा राग आल्याने प्रशांत गिरासेसह 7 जणांनी सतीश दौलत नगराळेचा खून करून वाल्मीक झाल्टे यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ शिक्षा : प्रशांत प्रवीणसिंग गिरासे, प्रमोद प्रकाश चौधरी, हर्षल देवीसिंग गिरासे, मयूर राजेंद्रसिंग गिरासे ंनिदरेष : भूषण दिलीप गिरासे, भटू गुलाबसिंग गिरासे, राहुल ईश्वरसिंग गिरासे