व्यापाऱ्यांची सक्तीने तपासणी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:40 AM2020-08-25T00:40:19+5:302020-08-25T00:41:38+5:30
तपासणीसाठी होणाºया गर्दीमुुळे व्यापाऱ्यांना कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
भुसावळ : कोरोना संसर्ग आटोक्यात यावा याकरिता प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची केली आहे. मात्र तपासणीसाठी होणाºया गर्दीमुुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्यांना लक्षणे नाहीत याची तपासणी नको या आशयाचे निवेदन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रांतांना दिले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील सर्वच व्यापारी, व्यावसायिकांना कोरोना तपासणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे मात्र तपासणीसाठी प्रत्यक्षात २०० लोक आल्यानंतर केवळ १०० जणांंची तपासणी होत असल्याने अन्य लोकांनी पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. यामुळे व्यापाºयांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. तपासणीमुळे म्युनिसीपल हायस्कूलमध्ये नाहक मोठी गर्दी होत आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यापाºयांची तपासणी केली जावी. तसेच सक्तीची तपासणी करू नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नितीन धांडे, भीमा कोळी, सदानंद वºहाडे यांनी प्रांताधिकाºयांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. प्रांत कार्यालयातील राहुल नाईक यांनी हे निवेदन स्वीकारले.