जबाबासाठी कोर्टात जावूच नका, किंवा गेलाच तर माझ्याच बाजूने द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:38+5:302021-05-30T04:14:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात फरार असलेल्या सुनील झंवर याने अनुप कुलकर्णी व ...

Don't go to court for an answer, or if you do, give it to me! | जबाबासाठी कोर्टात जावूच नका, किंवा गेलाच तर माझ्याच बाजूने द्या !

जबाबासाठी कोर्टात जावूच नका, किंवा गेलाच तर माझ्याच बाजूने द्या !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात फरार असलेल्या सुनील झंवर याने अनुप कुलकर्णी व उत्पल या दोन साक्षीदारांना तुम्ही जबाब द्यायला न्यायालयात जावूच नका किंवा गेलाच तर माझ्याच बाजूने जबाब द्या असे धमकावून दबाव टाकल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सूरज झंवर याला दिलेल्या जामीन आदेशातही न्यायालयाने तसा उल्लेख केल्याची माहिती सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी ''लोकमत'' दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने सुरज झंवर याला शुक्रवारी अटीशर्तीवर जामीन मंजूर केला. जामीनाच्या आदेशात हे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी सुनील झंवर यांचा मुलगा सुरज झंवर यानेही बँक अधिकार्‍यांना धमकाविल्याचा प्रकार समोर आला होता.

....तर जामीन रद्द करु

मुंबई उच्च न्यायालयाने सुरज झंवरला शुक्रवारी एक लाखांच्या जातमुलक्यावर जामीन मंजूर केला. यात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुरज झंवर याला महाराष्ट्राच्या बाहेर गेला किंवा साक्षीदारांना धमकाविल्यास जामीन रद्द होईल, अशी तंबी दिली आहेत. तसेच महाराष्ट्राबाहेर ज्याठिकाणी राहणार आहे, त्याठिकाणी राहत असल्याचा संपूर्ण पत्त्यासह मोबाईल क्रमांकाची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी असेही आदेशात म्हटले आहे.

सुरज झंवर याच्या जामीन अर्जावरील कामकाजाच्यावेळी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद केला. यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात सुनील झंवरने अनुप कुलकर्णी तसेच उत्पल नामक दोन साक्षीदारांना धमकाविले. दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत, माझ्या बाजूने पोलिसात जबाब द्या, किंवा जबाब द्यायला पोलिसात जावूच नका, त्यामुळे सुरज झंवर हा सुध्दा साक्षीदारांना धमकावू शकतो, असे अॅड. चव्हाण यांनी यावेळी म्हणणे मांडले होते.

Web Title: Don't go to court for an answer, or if you do, give it to me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.