रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:12+5:302021-04-21T04:17:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या अडचणी ...

Don't let it get in the way | रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका

रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दुर करण्यासाठी सर्व आमदार आणि खासदार नक्कीच मदत करु, मात्र आरोग्य यंत्रणा न सुधारल्यास रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद रंजना पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुलाल पटेल, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही जनतेच्या हितासाठी कुठलेच चांगले पाऊल उचलले नाही. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाही. ऑक्सिजनच्या साठ्याबाबतही अडचणी आहे. पंतप्रधान निधीतून आलेले ८४ व्हेंटिलेटर पूर्णपणे सुरळीत नाहीत. त्यासाठी लागणारे पुरेसे आणि कुशल मनुष्यबळदेखील नाही. त्यातच राज्य सरकार प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. शहरात रुग्ण उपचाराच्या शोधात फिरत आहोत. आम्ही पाचव्यांदा येथे आलो आहोत. जर भविष्यात उद्रेक झाला तर याला प्रशासन जबाबदार राहील. प्रशासनाने तातडीने व्हेंटिलेटर, बेडच्या समस्यांवर उपाय शोधावा, त्यासाठी प्रशासनाला सर्व आमदार, खासदार मदत करतील, आपल्या निधीतून रक्कम देऊ. तोदेखील पूर्ण होत नसेल तर वैयक्तिक मदतदेखील करू. मात्र प्रशासनाने आणि राज्य सरकारने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील भोळे यांनी केले.

यावेळी वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकुर, महानगराध्यक्ष डॉ. धमेंद्र पाटील, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, दीपक साखरे, गणेश माळी, प्रकाश पंडित उपस्थित होते.

Web Title: Don't let it get in the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.