घाबरू नका! चाचण्यांची वाढल्याने रूग्ण येताहेत समोर - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:56 PM2020-09-06T12:56:08+5:302020-09-06T12:57:19+5:30

लक्षणे जाणवताच स्वत:हून तपासणीस पुढे या

Don't panic! With the increase in tests, patients are coming forward | घाबरू नका! चाचण्यांची वाढल्याने रूग्ण येताहेत समोर - जिल्हाधिकारी

घाबरू नका! चाचण्यांची वाढल्याने रूग्ण येताहेत समोर - जिल्हाधिकारी

Next

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोनाची लक्षणे जाणवताच तपासणीसाठी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचणी वाढविल्या
शुक्रवारी जिल्ह्यात एकाच दिवशी १ हजार ६३ नवीन बाधित रुग्ण आढळल्याने जनतेच्या मनात भिती निर्माण होवू शकते. परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना संशयित रुग्णांची तपासणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरु नये तर स्वत:हून तपासणीसाठी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होवू नये याकरीता प्रतिबंधात्मक क्षेत्राचा परिसर कमी करण्यात आला आहे. या क्षेत्रातील नागरिकांची तपासणी प्राधान्याने करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले़
व्हायरल होत असलेला तो व्हीडिओ जुना़़़
गिरणा नदीवरील बांभोरी पुल हलत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही अफवा असून हा व्हिडीओ चोपडा तालुक्यातील गुळ नदीवरील जुना व्हिडीओ आहे. याबाबत संबंधितांना सुचना दिल्या असून तो पुल दुरुस्तही करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ या पार्श्वभूमीवर बांभोरी पुलाचीही पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश महामार्ग विभागास देण्यात आले असून जळगाव-फर्दापूर-औरंगाबाद रस्त्याच्या एक लेनचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सुचना दिल्याचे ते म्हणाले.
गिरणा पात्र लवकरच प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणार
जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे जागेवर जाऊन लवकरात लवकर करण्याच्या सूचनाही सर्व संबधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून वाळू उत्खनन होवून चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लवकरच तो क्षेत्र लवकरच प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले़
मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकांश ६० वर्षावरील रूग्ण
जिल्ह्यात मृत्यु होत असलेले बाधित रुगण हे बहुअंशी ६० वर्ष वयापेक्षा अधिकचे आहेत व त्यांना इतरही आजार आहेत. यावर मात करण्यासाठी मतदार याद्याचा आधार घेऊन ७० वर्षावरील नागरीकांची घरोघरी जाऊन तपासणीस प्राधान्य देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले़

Web Title: Don't panic! With the increase in tests, patients are coming forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव