लसीकरण बंद करून जनतेच्या जिवाशी खेळ करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:59+5:302021-05-12T04:16:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात ८ लाखाहून अधिक लसी शिल्लक असताना देखील महाविकास आघाडीने लसीकरण थांबवून जनतेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात ८ लाखाहून अधिक लसी शिल्लक असताना देखील महाविकास आघाडीने लसीकरण थांबवून जनतेच्या जिवाशी खेळ सुरू केला असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे.
राज्य शासनाने मंगळवारी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व लसीकरण आता ४५ वयापेक्षा अधिक असलेल्या नागरिकांना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य शासनाने हा निर्णय चुकीचा घेतला असून, या निर्णयामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आणण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही सुरेश भोळे यांनी केला आहे. तसेच इतर राज्ये व महाराष्ट्र यांना मिळालेल्या लसीकरणाची आकडेवारी देखील आमदार सुरेश भोळे यांनी सादर केली असून, राज्यात लसी उपलब्ध असताना लसीकरण बंद करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही सुरेश भोळे यांनी सांगितले आहे.