धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका!, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:09 AM2023-01-31T09:09:47+5:302023-01-31T09:10:49+5:30

Yogi Adityanath :

Don't play with zeal for conversion!, warns Yogi Adityanath | धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका!, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका!, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

googlenewsNext

- कुंदन पाटील 
जळगाव : सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरू होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करू नका, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिला. सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंध भारताला कुणीही रोखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोद्री (ता. जामनेर) येथे आयोजित अ. भा. हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरू रामदेवबाबा,  द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे श्यामचैतन्य महाराज, वृंदावन धामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज, बाबूसिंगजी महाराज यांच्यासह देशभरातील साधुसंत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 

सनातन धर्माशी छेडछाड सहन करणार नाही
nबंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्म घेतल्याचे सिद्ध केले आहे. सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे. 
nत्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे, असेही योगी म्हणाले. सनातन धर्माच्या मूल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे. मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील, तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला. 

रामदेवबाबा म्हणतात, देशात दोन संविधान 
देश चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे. मात्र धर्माला जगविण्यासाठी सनातन संविधान आवश्यक आहे. त्यामुळे देशात दोन संविधान असल्याचे धक्कादायक विधान योगगुरू  रामदेवबाबा यांनी केले. हिंदू धर्म विश्व धर्म आहे. सनातन धर्माची ताकद आणि मूल्यांना कुणीही हात लावू शकत नाही. धर्मांतराची भीक स्वीकारू नका. आपला ‘डीएनए’ सनातन धर्माचा आहे. त्यामुळे आपल्या दंडातल्या ताकदीतून कर्तृत्व दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Don't play with zeal for conversion!, warns Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.