स्वायत्ततेमुळे रोजगाराभिमुख शिक्षणाची दारे खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:45 PM2020-01-01T12:45:59+5:302020-01-01T12:46:35+5:30

केवळ पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारीक शिक्षणही : अभियांत्रिकी, मूू.जे. व प्रतापचा समावेश

The door to employment-oriented education opens up with autonomy | स्वायत्ततेमुळे रोजगाराभिमुख शिक्षणाची दारे खुली

स्वायत्ततेमुळे रोजगाराभिमुख शिक्षणाची दारे खुली

Next

आनंद सुरवाडे/डिगंबर महाले 
जळगाव : सरते वर्ष २०१९ हे जिल्ह्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे़ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया पाठोपाठ या वर्षी शहरातील मू़ जे़ महाविद्यालय आणि अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयास युजीसीकडून स्वायत्तता प्राप्त झाली़ चाईस बेस् क्रेडीट सीसीस्टम अधिक सुलभ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारभिमूख शिक्षणाची दारे अधिक खुली झालेली आहेत़
स्वायतत्त मिळालेली जिल्ह्यातील ही तीन महाविद्यालये आहेत.
अमळनेर
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मागील वर्षीच मिळाला आहे. यापूर्वी महाविद्यालयाला नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळी विद्यापीठा कडून मान्यता घ्यावी लागत असे. त्यात खूप वेळ खर्च होत असे.आता महाविद्यालय रोजगाराभिमुख जास्तीत जास्त अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. देशात आणि देशाबाहेरही रोजगाराभिमुख अभ्यासक्रम कोठे आणि कसे आहेत याचा महाविद्यालयातील काही तज्ञ मंडळी शोध घेत आहेत. त्या अभ्यासक्रमांना येथील विद्यार्थ्यांना मानवेल किंवा पेलवेल अशा पद्धतीने साचेबद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वायत्तता मिळण्यापूर्वी इंटर फॅकल्टी कोर्सेसही सुरू करणे शक्य नव्हते. आता फिजिक्स व इकॉनॉमिक्स या दोन विषयांच्या एकत्रिकरणातून नवीन कोर्सेस महाविद्यालय सुरू करू शकणार आहे.
१४ मार्च २०१९ रोजी मू़ जे़ महाविद्यालयाला यूजीसीकडून स्वायत्तता मिळाली़ पदवीसोबतच विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आवडीनुसार वेगळे विषय निवडण्याचे स्वातंत्र आहे़ एखादा, खेळ, संगीत, योगा, अशा प्रकारचे अभ्यासक्रमांना ते भाग घेऊ शकतात़ त्याचा रोजगारासाठीही उपयोग करू शकतात़ स्वायत्ततेमुळे विद्यापीठ अनुदान आयोग प्रणित ‘चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस) मूल्यमापन प्रणाली’ कार्यक्षम पद्धतीने राबविणे सुलभ होणार आहे़ कौशल्यावर आधारीत शिक्षण यामाध्यमातून दिले जाणार आहे़
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला गेल्या सहा वर्षापासून स्वायत्तता प्राप्त असून महाविद्यालयातील बोर्ड आॅफ स्टडीज आणि अकॅडमीक कॉन्सीलच्या मदतीने महाविद्यालयात अभ्यासक्रमात बदल करणे सोपे जाते़ २०१८ मध्ये महाविद्यालयात अभ्यासक्रम बदलविण्यात आला होता़ यासह पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात नाही व स्लो लर्नर असलेल्यांना याचा मोठा फायदा होऊन नैराश्यापासून विद्यार्थ्यांचा बचावही होतो़
स्वायत्ततेमुळे आता आम्हाला विद्यार्थ्यांची निवड करता येणार आहे़ त्यातच तीन वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याला एक कला व एक खेळ आलाच पाहिजे, हे उद्दीष्ट आहेत शिवाय कौशल्यावर आधारित शिक्षण आम्ही देतोय़
- डॉ़ उदय कुलकर्णी, प्राचार्य मू़ जे़ महाविद्यालय.
औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या बदलानुसार अभ्यासक्रमात बदल करू शकतो, जे विद्यार्थ्यांच्या करीयरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात़ शिवाय पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या अपयशाचे प्रमाण खूप कमी असते़ -आऱ डी़ कोकाटे,
प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय.
स्वायत्ततेमुळे राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियान अंतर्गत महाविद्यालय अनुदानासाठी पात्र ठरले आहे. परिणामी या वर्षी महाविद्यालयाला पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
-डॉ. ज्योती राणे, प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

Web Title: The door to employment-oriented education opens up with autonomy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव