राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघाची द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:06+5:302021-08-12T04:21:06+5:30

दीपनगर, ता. भुसावळ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची द्वारसभा मंगळवारी येथे ५०० मेगावॉट प्रवेशद्वारासमोर झाली. ...

Door meeting of State Backward Class Electrical Employees Union | राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघाची द्वारसभा

राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघाची द्वारसभा

Next

दीपनगर, ता. भुसावळ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची द्वारसभा मंगळवारी येथे ५०० मेगावॉट प्रवेशद्वारासमोर झाली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण प्रस्तावित करणाऱ्या विद्युत विधेयक २०२१ ला विरोध करण्यात आला.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खंडारे, कार्याध्यक्ष रोशन वाघ यांनी मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारने विश्रांतीच्या कामाच्या दिवशी म्हणजे ११, १२ किंवा १३ तारखेला संसदेच्या कोणत्याही सभागृहात जबरदस्तीने विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला तर स्थगित केलेले आंदोलन पुन:श्च सर्वशक्तीनिशी उभारले जाईल. याकरिता सर्व पदाधिकारी सभासद व कामगार बांधवांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले.

या द्वारसभेप्रसंगी सचिव अत्तर तडवी, प्रमुख सल्लागार एम. एम. पागवाड, संघटन सचिव विजय वाघ, उपाध्यक्ष प्रशांत वाघ, प्रसिद्धीप्रमुख मनोज जमदाडे, सहसचिव नितीन सोनवणे, दीपक बागुल, मुकेश मोरे, मनोहर बारऱ्हे, डी. के. गवळी, अरुण भागीरथ, गिरीश राऊत, कुंरदास जाधव, गोपाल इंगळे यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Web Title: Door meeting of State Backward Class Electrical Employees Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.