चोपड्यात बाधितांच्या संख्येचे द्विशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:06 PM2020-06-21T21:06:09+5:302020-06-21T21:06:47+5:30
पुन्हा २७ बाधित आढळले
चोपडा : येथील प्राप्त ९० अहवालात ६३ निगेटिव्ह आले तर २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २०० इतकी झाली आहे. त्यापैकी ८७ रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी आढलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील ११ जण असून मामलदेला दोन्ही महिला आहे. चुंचाळे येथे एक पुरुष तर तीन महिला, मंगरूळ येथे एक पुरुष, अकुलखेडा येथे दोन पुरुष तर दोन महिला आहेत. चोपडा शहरातील १६ रुग्ण आहेत. त्यात पंकज नगर मध्ये एक पुरुष एक महिला, प्रभात कॉलनीत एक महिला, मेन रोड परिसरात एक महिला, तेली वाडा भागात एक पुरुष तर दोन महिला, गुजर अळी , सुभाषचौक, शिव कॉलनी परिसर येथे प्रत्येकी एक पुरुष आढळला असून फुले नगरमध्य एक पुरुष व एक महिला, मल्हापुरा एक महिला, पटवेअळी येथे एक पुरुष तसेच पाटीलगढी व बोरोले नगर भागात प्रत्येकी एक महिला रुग्ण आणि बोरोले नगर भागात एक महिला असे रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली. या रुग्णांमध्ये ११ पुरुष तर १६ महिला आहेत.