‘लॉकडाऊन’ काळात जिल्ह्यात गंभीर गुन्हे ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:57 PM2020-03-31T22:57:24+5:302020-03-31T22:57:24+5:30

संचारबंदीआधी १४१ तर नंतर अवघे ६२ गुन्हे

'Down' serious crime in district during 'lockdown' | ‘लॉकडाऊन’ काळात जिल्ह्यात गंभीर गुन्हे ‘डाऊन’

‘लॉकडाऊन’ काळात जिल्ह्यात गंभीर गुन्हे ‘डाऊन’

Next

सुनील पाटील
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू झाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वावर झालेला आहे. संचारबंदी लागू होण्याच्या एक आठवडाआधी जिल्ह्यात हाणामारी, दंगल, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कार यासारखे १४१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत तर संचारबंदी लागू झाल्यापासून आठवडाभरात हाच आकडा अवघ्या ६२ वर आला आहे. याच कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अन्वये ७१ गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात एकाच आठवड्यात भाग ५ चे कमीत कमी २०० च्यावर गुन्ह्यांची नोंद होत असते. भाग ५ मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, दंगल, हाणामारी, बलात्कार, विनयभंग व अपहरण सारख्या घटनांचा समावेश होता. २२ मार्चपासून या घटनांना आळाच बसला आहे. अपवादात्मक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. १५ ते २९ मार्च या कालावधीत हरविलेल्या व्यक्तीबाबत ४८ प्रकरणांची नोंद झाली आहे. १५ मार्चपासून जिल्ह्यात ५६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात अवैध दारु विक्रीचे ९०, जुगाराचे २४, आत्महत्या, अकस्मात मृत्यू ९१ व आगीच्या ५ घटना घडल्या आहेत.
रावेर दंगल अपवाद
संचारबंदी व जनता संचारबंदी या काळात रावेरची दंगल मात्र याला अपवाद ठरली आहे. चौकशीअंती संचारबंदी याच कारणामुळे येथे दंगल उसळली व त्यात एकानिष्पाप व्यक्तीचा खून झाला. याप्रकरणा सहा गुन्हे दाखल झाले असून ९० च्यावर संशयितांना अटक झालेली आहे. जळगाव शहरातील गुन्हेगारी मात्र कमालीची घटली आहे. चोरी,घरफोड्या, सोनसाखळी लांबविणे, प्राणघातक हल्ला यासारख्या घटनांना आळा बसला आहे. शिवाजी नगरात एक किराणा दुकान फोडल्याचा प्रकार याला अपवाद आहे.
अपघाताच्या घटना थांबल्या
संचारबंदी काळात जिल्ह्यात एकही अपघात झाला नाही. रोजच्या अपघाताची आकडेवारी १५ ते २०च्या घरात आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआड अपघातात जीव जातो. संचारबंदीत अपघाताच्या घटना थांबल्या असून आजारपणही कमी झालेले आहे.रस्त्यावर फिरायला निर्बंध असल्याने अनावश्यक वाहनेच रस्त्यावर दिसत नाही. त्याशिवाय दारुचे दुकाने बंद आहेत. मद्याच्या नशेत अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्या थांबल्या आहेत.
अशी आहे गुन्ह्यांची स्थिती
१५ ते २१ मार्च गंभीर गुन्हे : १४१
२२ ते २९ मार्च गंभीर गुन्हे : ६२
१५ ते २९ मार्च एकूण गुन्हे : ५६८
कोरोना संदर्भातआदेशाचे उल्लंघन : ७१

Web Title: 'Down' serious crime in district during 'lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव