ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम

By विजय.सैतवाल | Published: January 17, 2024 03:08 PM2024-01-17T15:08:01+5:302024-01-17T15:08:28+5:30

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Downloaded the app and lost 10 lakhs, an amount given periodically as a lure to invest in shares | ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम

ॲप डाऊनलोड केले अन् १० लाख गमावले, शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी दिली रक्कम

जळगाव : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व त्यासाठी संबंधित कंपनीचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून दीपाली मकरंद चौधरी (३३, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) यांची नऊ लाख ८२ हजार ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहिणी असलेल्या दीपाली चौधरी यांच्याशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान अभिलाषा, अल्बर्ट त्रिवेदी, अक्षय ठाकूर असे नाव सांगणाऱ्यांसह एका कंपनीच्या कस्टमर केअरच्यावतीने संपर्क साधण्यात आला. त्या वेळी चौधरी यांना एका कंपनीचे नाव सांगून त्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून मोठा नफा मिळण्याची बतावणी केली. त्यासाठी या महिलेला सदर कंपनीचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी रक्कम स्वीकारली.

बरेच दिवस झाले तरी नफा मिळणे दूरच मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चौधरी यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील नावे सांगणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करत आहेत.
 

Web Title: Downloaded the app and lost 10 lakhs, an amount given periodically as a lure to invest in shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.