जळगावातील समांतर रस्त्याचा ‘डीपीआर’ तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:19 PM2018-02-24T12:19:22+5:302018-02-24T12:19:22+5:30
वाढत्या अपघातांमुळे महामार्गाचे चौपदरीकरण तसेच समांतर रस्त्याची मागणी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - महामार्गाच्या समांतर रस्त्याचा ‘डीपीआर’ तयार झाला असून तो दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. त्यास मंजुरी मिळल्यानंतर कामास सुरुवात होईल.
महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे महामार्गाचे चौपदरीकरण तसेच समांतर रस्त्याची मागणी आहे. १० जानेवारी समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लेखी पत्र देऊन १५ फेब्रुवारी पर्यंत समांतर रस्त्याचा डिपीआर तयार केला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंतही डिपीआर तयार न झाल्याने या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.
राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे अरविंद काळे यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधला असता समांतर रस्त्याचा डिपीआर तयार झाला आहे. हा डीपीआर आता दिल्ली येथे पाठविला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारले असता, प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.