डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:16+5:302020-12-11T04:43:16+5:30

जळगाव : डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल नुकताच संकेतस्थळावर जाहिर झाला. यात महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल ...

Dr. 100% result of Ulhas Patil Physiotherapy College | डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

Next

जळगाव : डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल नुकताच संकेतस्थळावर जाहिर झाला. यात महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला . सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून उच्च निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली आहे.

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातून प्रथम व्टिंकल देवपा (७८ टक्के), द्वितीय अमर दामले (७७ टक्के) तर तृतीय क्रमांक कोमल सिंग (७४ टक्के) हिने मिळविला. महाविद्यालयातून २१ विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.आपल्या उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली.डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.चित्रा म्रिधा, डॉ.प्रिया देशमुख, डॉ.कल्याणी नागुलकर, डॉ.विष्णु रानडे, डॉ.अनुराग मेहता, डॉ.भवानी राणा, डॉ.सुरभी हिंदोचा, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.निखील पाटील, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, भारती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात जल्लोष करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Dr. 100% result of Ulhas Patil Physiotherapy College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.