डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 04:53 PM2019-08-10T16:53:41+5:302019-08-10T17:00:42+5:30
पत्रपरिषद : प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांची माहिती
जळगाव- शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली असल्याची माहिती शनिवारी प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी, उपप्राचार्य डॉ. बी.पी.सावखेडकर, आर.एन.महाजन, प्रा. एन.एस.पाटील, डॉ.जे.डी. लेकुरवाडे व संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.
बैंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यमापन आणि प्रमाणिकरण संस्था अर्थात नॅक मार्फत १८ ते १९ जुलै २०१९ रोजी माजी कुलगुरू प्रा.डॉ.मणिमाला दास यांच्या अध्यक्षतेखाली पीअर टीमकडून महाविद्यालयास भेट देण्यात आली होती.या पथकामध्ये माजी हंगामी कुलगुरू व विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शिवा हुराकडली आणि थिरूमंगलम येथील कला, विज्ञान महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ. राजेश्वरी राव यांचा समावेश होता. या पथकाकडून महाविद्यालयातील विषय विभाग, प्रयोग शाळा, कार्यशाळा तसेच हस्तकला प्रदर्शनीत रूचिरा, स्पर्धा परीक्षा केंद्र, एफटी टू इन्स्टीट्युट, एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी कल्याण विभागांना भेटी देऊन तपासणी केली होती. सोबच महाविद्यालयाकडून विद्यार्थिनींसाठी सुरू केलेले कौशल्याधिष्टीत व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांची, विविध अभ्यासपूरक उपक्रमांची माहिती देत विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाविद्यालयास मिळालेल्या ११ रोजगाराभिमूख अभ्यासक्रमांची माहिती पथकाला देण्यात आली होती. याप्रसंगी शिक्षणतज्ञ अनिल राव, प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्रा. डॉ. एस.टी. इंगळे यांची उपस्थिती होती़ सोबतच पुढील वाटचालीची माहिती सुध्दा नॅक समितीला देण्यात आली होती. त्यानुसार पाहणीचा व तपासणीचा संपूर्ण अहवाल समितीकडून सादर करण्यात आला होता. त्याचा नुकताच निकाल लागला असून महाविद्यलयास विविध निकषांवर आधारित ३.१२ सरासरी गुण देऊन सदर समितीने ‘अ’ श्रेणीचे मूल्यांकन देण्यात आले आहे, अशी माहिती सुध्दा प्राचार्य डॉ. एस.एस.राणे यांनी दिली़
यांनी घेतले परिश्रम
नॅम मूल्यांकनासाठी महाविद्यालयातील सुकाणू समिती समन्वयक प्रा. डॉ.बी.पी.सावखेडकर, आर.एन.महाजन, प्रा. ए.एम.नेमाडे, प्रा. व्ही.जे.पाटील, आर.आर.ठोसरे, डॉ.बी.एस.पवार, एस.ए.परशुरामे, डॉ. डी.डी.नारखेडे, नितीन इंगळे, डॉ.एल.एस.पाटील, डॉ.एस.एस.चौधरी, डॉ.जे.डी.लेकुरवाळे, प्रा. एस.एस.राजपुत, एस.ए.झोपे, पी.एन.भिरूड, एम.आर.धांडे, एस.एन.चौधरी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.