जळगाव जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अपूर्व उत्साह, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लेझीम खेळून वाढविला कार्यकर्त्यांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:15 PM2018-04-14T13:15:00+5:302018-04-14T13:15:00+5:30
मिरवणुकांनी वेधले लक्ष
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध संस्थांतर्फे शनिवारी मिरवणूक काढून शहरवारवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी हजेरी लावली. नीळे फेटेधारी युवक, युवती तसेच हातात नीळे झेंडे व जय भीमचा गजर... असे चैतन्यमय वातावरण होते.
अभिवादन सभा
जळगाव रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अभिवादन सभा झाली. सभेस माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सीईओ शिवाजी दिवेकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, गफ्पार मलिक, शिवचरण ढंढोरे, गणी मेमन, मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम खेळून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
१२७ किलोंचा कापला केक
जळगाव येथे भिमराज गु्रपतर्फे रेल्वेस्टेशन परिसरात शनिवारी सकाळी ९ वाजता चिमुकल्यांच्याहस्ते १२७ किलोंचा केप कापण्यात आला़
भिमराज ग्रुपतर्फे दरवर्षी डॉ़ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केप कापण्यात येतो़ यंदा गु्रपचे सातवे वर्ष होते़ यावेळी गु्रपचे अध्यक्ष बबलू सावळे, अजय बागूल, विजय गायकवाड, रमेश सोनवणे, जुबेर खाटीक, भोला बिहारी आदी सदस्य उपस्थित होते़ चिमुकल्यांसह काही तरूणींनी निळे फेटे घालून केकसोबत सेल्फी काढली़ कार्यक्रमाच्या सुरूवातीस ग्रपतर्फे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़
१२७ रोपट्यांचे रोपण
अजिंठा हाऊसिंग सोसायटी जळगावतर्फे भीम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून १४ एप्रिल रोजी सकाळी अजिंठा सोसायटी व शांती निकेतन सोसायटी येथे १२७ वृक्षांचे रोपण करण्यात आले.