डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:11+5:302020-12-22T04:16:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्रात सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्रात सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १६ दात्यांनी रक्तदान केले.
शिबीराचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे या दक्षता पाळून रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थिनी अशा १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी वैद्यकीय
महाविद्यालयाचे डॉ. नितीन भारंबे, डॉ. पृथ्वी मजलकोडी, डॉ. रितेश वारके, डॉ. एस. एम. शेख, लक्ष्मण पाटील, परिचारिका दिपाली बागडे व जया पाटील यांनी शिबीराचे संयोजन केले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुजाता गायकवाड, प्रा. दीपक पवार, प्रा. स्नेहल परशुरामे, प्रा. जितेंद्र मोरे, कॅप्टन नंदा बेंडाळे तसेच रासेयो स्वयंसेविका, राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.