डॉ. बी.पी.पाटील "मुक्त"चे परीक्षा संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:17+5:302021-04-21T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रा.पी.पी.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठात सद्यस्थितीला प्रभारी राज सुरू आहे. आता विद्यापीठातील परीक्षा संचालक डॉ.बी.पी.पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रा.पी.पी.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठात सद्यस्थितीला प्रभारी राज सुरू आहे. आता विद्यापीठातील परीक्षा संचालक डॉ.बी.पी.पाटील यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी राजमध्ये आणखी भर पडणार आहे. दरम्यान, हळूहळू एक-एक अधिकारी विद्यापीठातून जात आहेत. हे कुणाला कंटाळून जात आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू भंगाळे यांनी केली आहे.
१० एप्रिल रोजी मुक्त विद्यापीठात परीक्षा संचालकासाठी मुलाखती झाल्या होत्या. त्याठिकाणी डॉ.बी.पी.पाटील यांनी मुलाखत दिली होती. पाटील यांची नियुक्ती झाल्याची घोषणा सुध्दा प्रभारी कुलगुरू ई.वायुनंदन यांनी पदवी प्रदान व कुलगुरू निवडीच्या बैठकीत केली आहे, अशी माहिती विष्णू भंगाळे यांनी दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३ मे रोजी पदवी प्रदान समारंभ होणार आहे आहे. त्यानंतर ते मुक्त विद्यापीठातील पदभार स्वीकारणार आहेत. सध्या एक-एक अधिकारी विद्यापीठातील पदभार सोडून जात आहे. प्रमुख पदांवर प्रभारी राज सुरू आहे. परीक्षा संचालक पद रिक्त झाल्यावर ठिकाणी प्रभारी अधिकारी पदभार स्वीकारेल. असे होत गेले तर विद्यापीठाल घरघर लागेल. त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी कुणाला कंटाळून जात आहेत व ही प्रक्रिया कुणाच्या इशा-याने पार पडली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विष्णू भंगाळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.