डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयाची केंद्रीय समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:59+5:302021-04-13T04:15:59+5:30

पथकात सदस्या डॉ. अनुपमा बेहरे, एम्स, डॉ. श्रीकांत, एम्स, जोधपूर भुवनेश्वर यांचा समावेश आहे. सोमवारी या समितीने डॉ.उल्हास ...

Dr. Central Committee inspects Ulhas Patil Kovid Hospital | डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयाची केंद्रीय समितीकडून पाहणी

डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयाची केंद्रीय समितीकडून पाहणी

Next

पथकात सदस्या डॉ. अनुपमा बेहरे, एम्स, डॉ. श्रीकांत, एम्स, जोधपूर भुवनेश्वर यांचा समावेश आहे. सोमवारी या समितीने डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.एन.एस.आर्विकर यांच्या समवेत चर्चा केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रैय्या कांते, डॉ.ढेकळे आदी उपस्थित होते. डॉ.अनुपमा बेहरे, डॉ.श्रीकांत यांनी अतिदक्षता विभागात, सामान्य कक्ष तसेच व्हीआयपी कक्षाला भेटी देवून तेथील उपचारांची माहिती घेतली.

नशिराबादला जि.प. उपाध्यक्षांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

नशिराबाद : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच कौटुंबिक वातावरणात साधेपणाने कलिंगड, फळे कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. लोकमतच्या विशेष पुरवणीचे याप्रसंगी विमोचन करण्यात आले. अनेक नेते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भ्रमणध्वनी द्वारा व सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लालचंद पाटील यांच्या सौभाग्यवती वैशाली पाटील यांनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमाला नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र पाचपांडे, किशोर पाटील, किरण पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, जितेंद्र महाजन, मोहन येवले, मनोज रोटे, प्रदीप माळी, राजू पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंदा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, माजी सरपंच विकास पाटील, यांच्यासह सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Dr. Central Committee inspects Ulhas Patil Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.