डॉ. अविनाश आचार्य यांना देणार ‘जळगाव रत्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:17 AM2021-03-26T04:17:24+5:302021-03-26T04:17:24+5:30

याप्रसंगी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार यांच्यासह महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, ...

Dr. Jalgaon Ratna to be given to Avinash Acharya | डॉ. अविनाश आचार्य यांना देणार ‘जळगाव रत्न’

डॉ. अविनाश आचार्य यांना देणार ‘जळगाव रत्न’

googlenewsNext

याप्रसंगी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार यांच्यासह महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, ललित धांडे आदी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की पूज्य दादांच्या कार्याची ओळख ही पिढ्यान्पिढ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी निरंतर प्रेरणादायी राहणारी आहे. दादांनी समाजाची सेवा करण्याची कृतिशील भगवद्गीताच जणू लिहून ठेवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शक पथावर निरंतर कार्य करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. आम्ही सर्व समाजसेवक या कृतीसाठी वचनबद्ध आहोत. सद्यःस्थितीतील ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्या वतीने पूज्य दादांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देऊन आम्ही सर्वजण निश्चितपणे कृतार्थ होऊ.

‘जळगाव रत्न’ पुरस्कारासंदर्भातील पत्र यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी डॉ. हुजूरबाजार यांच्याकडे सुपूर्द केले.

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही गौरविणार

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिकेने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचाही यथोचित सन्मान ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर केला जाईल, असेही याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

Web Title: Dr. Jalgaon Ratna to be given to Avinash Acharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.