डॉ. मिलिंद कोंडाळकर यांना पीएच.डी. प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:45+5:302021-02-11T04:17:45+5:30
व. वा. जिल्हा वाचनालयाच्या अभ्यासिकेत प्रवेश सुरू जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून व.वा. जिल्हा ...
व. वा. जिल्हा वाचनालयाच्या अभ्यासिकेत प्रवेश सुरू
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून व.वा. जिल्हा वाचनालयाची अभ्यासिका ११ फेब्रुवारीपासून सकाळी ८.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत नियमित सुरू होत आहे. या अभ्यासिकेत मर्यादित विद्यार्थांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तरी स्पर्धा परिक्षेच्या ज्या विद्यार्थांना अभ्यासिकेत प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी ३०० रुपये अभ्यासिका शुल्क भरुन आपला प्रवेश निश्चित करावा, तसेच अधिक माहितीसाठी अभ्यासिका समितीच्या निमंत्रक संगीता अट्रावलकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
जळगाव : शहरातील मू. जे. महाविद्यालय परिसरात रात्री अनेक ठिकाणी पथदिवे बंद राहत असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी रात्री चोरी-लुटमारीचे प्रमाण घडण्याची शक्यता वर्तिविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने रात्रीच्या वेळी सर्व ठिकाणी नियमित पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.