जळगावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:10 PM2018-05-12T13:10:05+5:302018-05-12T13:10:05+5:30

नानासाहेबांकडून पिढी घडविण्याचे कार्य - गुलाबराव पाटील यांचे मत

Dr. Nanasaheb Dharmadhikari program in Jalgaon | जळगावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

जळगावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ - डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पिढी घडविण्याचे कार्य सुरु आहे, असे स्पष्ट मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले.
पुढारी खरं बोलत नाही आणि जनतेला खरं बोललेलं चालत नाही, मात्र या व्यासपीठावर खोटं बोलता येणार नाही, असे सांगत डॉ.नानासाहेबांच्या उदात्त कार्याचे त्यांनी कौतुक केले.
पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते. व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, उपसभापती शितल पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पं. स. सदस्या ज्योती महाजन, विमल बागुल व नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटविकास अधिकारी शकुंतला सोनवणे, फुपणीचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील, अ‍ॅड.हर्षल चौधरी, जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे आदींची मुख्य उपस्थिती होती.
सद्गुुरु बैठकींमधून खूप चांगले काम सुरु आहे. आम्ही पुढारी वृक्षारोपण करुन मोकळे होतो आणि स्वच्छता मोहिमेचा झाडू फक्त फोटो काढाण्यापुरता हातात घेतो. परंतु हे कार्य धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य प्रामाणिकपणे करीत आहे. अशा धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समांतर सरकार असायला हवे, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेतही त्यांच्या प्रतिमा अनावरणाचा विचार लवकर अंमलात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. तर महिलांसह मोठ्या उपस्थितीचे कौतुक करताना राजकारण्यांना एवढी गर्दी जमा करायची असेल तर ५ लाख रुपये खर्च करावे लागतात, असे सांगून हे सर्व नानासाहेबांच्या श्रद्धेने शक्य आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.
मी सरळ वागायला लागलो... गुलाबराव पाटील
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, योगायोगाने अप्पासाहेबांची माझी मागे भेट झाली. यानंतर माझ्या कार्यालयात नानासाहेबांचा फोटो लावला आणि मी सरळ वागायला लागलो. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर काही वेळ तरी आपण ठिकाणावर येतो, असेही ते म्हणाले.
नानासाहेब यांच्या विचारांची राजकीय मंडळींना गरज
एक वेळ रस्ते बनले नाही तरी चालेल पण पिढी घडण्याचे काम होणे गरजेचे आहे... आणि हे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादनही गुलाबराव पाटील यांंनी केले. यावेळी सुरेश भोळे म्हणाले की, नानासाहेबांच्या विचारांची राजकीय लोकांना खरी गरज असून त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला हवे. तसेच जळकेकर महाराज यांनीही विचार व्यक्त केले.भाविका सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Dr. Nanasaheb Dharmadhikari program in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव