डॉ.नागुराव चव्हाण जळगावचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:46 PM2017-08-06T12:46:44+5:302017-08-06T12:49:12+5:30
बदली : डॉ.भामरे यांची मुंबई येथे नियुक्ती
Next
ठळक मुद्दे डॉ. सुनील भामरे यांची वडाळा, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटीचे संचालक म्हणून बदली बदलीचे आदेश विभागाच्या साईटवरदोन दिवस सुटय़ा आल्याने मंगळवार अथवा बुधवारी आदेश मिळण्याची शक्यता
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 6 - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांची वडाळा, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटीचे संचालक म्हणून बदली झाली. या संदर्भात शनिवारी आरोग्य विभागाकडून बदलीचे आदेश विभागाच्या साईटवर टाकण्यात आले. डॉ. भामरे त्यांच्या जागी बीड येथील अतिरिक्त जिल्हा चिकीत्सक नागुराव शिवाजी चव्हाण हे येणार आहेत.
साईटवर बदलीचे आदेश टाकण्यात आले असले तरी अद्याप डॉ. भामरे यांना आरोग्य उपसंचालकांकडून आदेश मिळालेले नाही. त्यात आता दोन दिवस सुटय़ा आल्याने मंगळवार अथवा बुधवारी आदेश मिळण्याची शक्यता आहे. बदलीच्या वृत्तास डॉ.भामरे यांनी दुजोरा दिला.