भाजप उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी डॉ.नी.तु.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:57 PM2020-10-07T14:57:13+5:302020-10-07T14:57:38+5:30
भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ.नी.तू. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भुसावळ : भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ.नी.तू. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी निवड केली. यात समन्वयक, सहसंयोजक, विभागीय सहसंयोजक व सहसंयोजक व मार्गदर्शक मंडळ यांची घोषणा करण्यात आली.
उत्तर महाराष्ट्र कार्यकारीणीत संयोजक पदी डॉ. प्रशांत पाटील यांची तर सहसंयोजक पदी डॉ.श्रीराम भतवाल, भुसावळचे डॉ. नी. तू. पाटील, डॉ.योगेश पाटील आणि डॉ.रघुनाथ नामपूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.नी. तू. पाटील हे मूळचे तालुक्यातील तळवेल येथील असून, २००७ पासून ते पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. शिक्षण घेत असताना २०१० पासून चिपळूण येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेपासून सुरवात झाली. नंतर भारतीय जनता युवा मोर्चा चिपळूण शहर सरचिटणीस, युवा मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश सदस्य व भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदी पदांवर सेवा दिली आहे. या नियुक्तीबद्दल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी अभिनंदन केले आहे.