डॉ. मकरंद चांदवडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:29+5:302021-06-23T04:12:29+5:30
भुसावळ : येथील दंत चिकित्सक डॉ. मकरंद चांदवडकर लिखित ‘मकरंद्स फेवरेट आयडिया फ्रॉम ५० बुक्स’ (५० पुस्तकातील मकरंदच्या ...
भुसावळ : येथील दंत चिकित्सक डॉ. मकरंद चांदवडकर लिखित ‘मकरंद्स फेवरेट आयडिया फ्रॉम ५० बुक्स’ (५० पुस्तकातील मकरंदच्या आवडत्या कल्पना) हे ५० पुस्तकांचा सारांश असलेले पुस्तक (बुकलेट) आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
गेल्या वर्षापासून लागलेल्या लॉकडाऊनपासून बऱ्याच बाबी विस्कळीत झाल्या. पण लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून भुसावळ येथील डॉ. चांदवडकर यांनी वर्षभरात तब्बल ५० हून अधिक विविध विषयांवरील पुस्तके वाचून काढली.
आपण वाचलेल्या पुस्तकांचा आपल्यासोबत इतरांनादेखील लाभ व्हावा या विचाराने त्यांनी एक अफलातून कल्पना काढली. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश व त्या पुस्तकातील चांगली माहिती संकलित करून पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचे ठरवले. याकामी मोलाची मदत केली ठाणे येथील वाचक अमृत देशमुख यांनी.
जनतेत वाचनाची आवड निर्माण करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असून या पुस्तकाच्या विक्रीतून आलेल्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याचा संकल्प असल्याचे डॉ. चांदवडकर यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. कीर्ती चांदवडकर, सोनू मांडे, चेतन पाटील, मनोज सोनार आदी उपस्थित होते.