डॉ. आर.एस. माळी यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:47+5:302021-02-11T04:18:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी ...

Dr. R.S. Gardener Lifetime Achievement Award | डॉ. आर.एस. माळी यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

डॉ. आर.एस. माळी यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी यांचा गौरव करण्यात आला आहे. डॉ. माळी यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात केेलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुधवारी सकाळी पार पडला.

त्यांनी पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनदेखील काम पाहिले आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. माळी यानी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा आणि मसुदा तयार करून तो सरकारला सादर केला होता, तसेच ते लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे सदस्यदेखील आहेत.

त्यांना या आधीदेखील विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच डॉ. प्रशांत हिरे, न.म. जोशी, सुधीर गाडगीळ, प्रा. साधना झाडबुके, माजी सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

फोटो - डॉ. आर. एस. माळी यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करताना डॉ. रवींद्र कोल्हे सोबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर.

Web Title: Dr. R.S. Gardener Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.