शासनाच्या लोककलावंत निवड समितीवर डॉ.सत्यजित साळवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:49+5:302021-08-12T04:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून लोककलावंत निवडीसाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून लोककलावंत निवडीसाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील गरजू- गरीब लोक कलावंत निवडीसाठी डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सत्यजित साळवे यांची सदर समितीवर निवड करण्यात आली आहे.
कोरोना काळात कोरोना संबंधित जनजागृती, लसीकरण या संदर्भातील जनजागृती इत्यादी कार्यक्रम लोक कलावंतांकडून गाव खेडे वाड्या-वस्त्या येथे गल्लोगल्ली सादर करून त्या कार्यक्रमांचे पाच हजार रूपये मानधन लोककलावंतांना शासनातर्फे देण्यात येणार आहे. एकल अथवा तीनच्या गटाने लोककला अर्थात वासुदेव, गोंधळी, कलगीतुरा, भारुड, वाघ्या आणि मुरळी, पोतराज ,सोंगाड्या पार्टी, आंबेडकरी जलसे सादर करणाऱ्या लोककलावंतांनी आपली संपूर्ण माहिती व कलाप्रकार सादरीकरणाचा पुरावा आदींची माहिती प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.